शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिया, खुशी यांनी प्रभावित केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:38 IST

‘बीडब्ल्यूबी मुलींच्या शिबिराचा खूप चांगला अनुभव असून युवा खेळाडूंनी प्रभावित केले आहे.

रोहित नाईक  नवी दिल्ली : ‘बीडब्ल्यूबी मुलींच्या शिबिराचा खूप चांगला अनुभव असून युवा खेळाडूंनी प्रभावित केले आहे. चीन, आॅस्टेÑलिया आणि इतर देशांतील खेळाडूंसह भारताच्या मुलींचा खेळ पाहणे शानदार ठरले आहे. विशेष म्हणजे भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.ग्रेटर नोएडा येथील भारतीय एनबीए अकादमी येथे सुरु असलेल्या ‘बास्केटबॉल विदाऊट बॉर्डर्स’ (बीडब्ल्यूबी) शिबिरामध्ये १७ वर्षांखालील मुली रुथच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये १६ देशांतील ६६ खेळाडूंनी सहभाग घेतला असून यात १८ भारतीय मुलींचा समावेश आहे. यानिमित्ताने रुथने ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय मुलींच्या कामगिरीविषयी रुथने म्हटले की, ‘युवा भारतीय मुलींनी प्रभावित केले आहे. हे माझे भारतातील पहिलेच शिबिर असल्याने भविष्यात या मुली कितपत मजल मारतील आत्ताच सांगता येणार नाही, पण या सर्वांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. तांत्रिकदृष्ट्या शूटिंग आणि पासिंगमध्ये सर्व खेळाडू कसलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतीय मुली कल्पकतेने खेळतात. त्यांना एखादी गोष्ट समजावण्यासाठी केवळ एकदाच सांगावे लागते. त्यानंतर ते आपला खेळ सादर करतात.’या वेळी रुथने नागपूरच्या सिया देवधर आणि औरंगाबादच्या खुशी डोंगरे यांचे विशेष कौतुक केले. रुथ म्हणाली की, ‘सिया आणि खुशीचा खेळ पाहण्यात वेगळीच मजा आहे. सिया शिबिरातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू आहे. प्रत्येक दिवसागणिक तिचा खेळ सुधारत आहे. ती सर्वोत्तम बचावपटू असून उत्कृष्ट शूटरही आहे. त्याचबरोबर खुशीही तोडीस तोड आहे. ती स्वत:च्या उपस्थितीने आपल्या संघाला मजबूत करते. शिवाय चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण ठेवून गुणांची कमाई करणे तिला आवडते. या दोन्ही खेळाडूंचा खेळ पाहण्यात आनंद आहे.’त्याचप्रमाणे, ‘सिया व खुशी दोघींचेही भविष्य उज्ज्वल आहे. जर या दोघींनी आपला खेळ असाच बहरत ठेवला, तर त्यांना केवळ भारतीय संघातच नाही, तर यूएसएमध्येही मोठी संधी मिळेल. तसेच, कॉलजनंतर सिया व खुशी व्यावसायिक स्पर्धेतही छाप पाडतील. पण तरी त्यांना अजून आपल्या खेळावर मेहनत घ्यावी लागेल आणि दोघीही मेहनती आहेत,’ असेही रुथने या वेळी सांगितले.