शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

World Badminton Championships 2018: सिंधू, साईप्रणितच्या विजयाचा भारतीयांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 4:33 PM

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले.

नानजिंग (चीन) : जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा तिसरा दिवस भारतीयांसाठी निराशाजनक राहीला. एकापाठोपाठ एक खेळाडूंचे आव्हान संपुष्टात येत असताना ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू आणि बी. साईप्रणित यांच्या विजयाने भारतीयांच्या चेह-यावर स्मिथ फुलवले. स्पर्धेच्या सकाळच्या सत्रात किदम्बी श्रीकांतने विजयी धडाका कायम राखला होता.  

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधूने बुधवारी इंडोनेशियाच्या फित्रीयानीचे आव्हान 21-14, 21-9 असे सहज परतवले. तिने पहिला गेम अवघ्या 15 मिनिटांत 21-14 असा जिंकून आघाडी घेतली. हा गेम 4-4 असा बरोबरीत असताना सिंधूने जबरदस्त स्मॅश लगावले आणि 17-7 अशी आघाडी वाढवली. त्यानंतर फित्रीयानीने 5 गुण घेत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. पण, जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सिंधूने हा गेम जिंकला.

जागतिक स्पर्धेत दोन कांस्य ( 2013 व 2014) आणि एक रौप्यपदक ( 2017) जिंकणा-या सिंधूच्या आक्रमक खेळासमोर इंडोनेशियाची खेळाडू निष्प्रभ झालेली पाहायला मिळाली. त्याचाच फायदा उचलत सिंधूने हाही गेम 21-9 असा जिंकला आणि विजयी सलामी दिली.  पुरूष एकेरीत बी साईप्रणितने 33 मिनिटांत स्पेनच्या लुइक एन्रीक पेनालव्हेरचा 21-18, 21-11 असा पराभव केला आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुस-या लढतीत एच एस प्रणॉयलाही धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझिलच्या यगोर कोएल्हो या बिगरमानांकित खेळाडूने 0-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना 8-21, 21-16, 21-15 अशा फरकाने प्रणॉयला पराभूत केले. पुरूष दुहेरीत सात्विकसाईराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना 1 तास 08 मिनिटांच्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागला. डेन्मार्कच्या किम अॅस्ट्रप व आंद्रेस रॅस्मुसेन यांनी 21-18, 15-21, 21-16 अशा फरकाने भारतीय खेळाडूंचा पराभव केला. मनू अत्री व बी सुमिथ रेड्डी यांना कडव्या संघर्षानंतर जपानच्या ताकुटो इंक्यू व युकी कानेको यांच्याकडून 24-22, 13-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांचेही आव्हान संपुष्टात आले. जपानच्या युकी फुकुशीमा व सकाया हिरोटा या जोडीने 21-14, 21-15 अशा फरकाने 37 मिनिटांत पोनप्पा-रेड्डी यांना गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonSportsक्रीडा