शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची आगेकूच, उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 9:06 PM

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

नवी दिल्ली, दि. 22 - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने एकतर्फी झालेल्या सामन्यात रशियाच्या सर्जी सिरांत याचा सरळ दोन गेममध्ये फडशा पाडून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर आजच्या दिवशी रिओ ऑलिम्पिकची रौप्यविजेती भारतीय स्टार पी. व्ही. सिंधूने किम जोचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. सिंधूने कोरियन प्रतिस्पर्धी किम ह्यो मिनचा 21-16 आणि 21-14 अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.  पहिल्या सामन्यात सिंधूला बाय मिळाला होता. त्यामुळे सिंधूनं आता उपउपांत्यापूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  पुरुष खेळाडूंमध्ये साई प्रणीतने आपली विजयी सुरुवात केली आहे.

कोरियन प्रतिस्पर्धी किम ह्यो मिन बरोबरच्या पहिल्या सामन्यात सिंधूने एकतर्फी विजय मिळवला. पहिल्याच सेटमध्ये किम ह्यो मिनला बॅकफूटवर ढकलत 8-0 अशी आघाडी घेतली. पहिला सेट एकतर्फी होणार असे वाटत असतानाच किम ह्योनं सामन्यात दमदार पुनरागमन केलं. पण सिंधूला त्याचा फारसा फरक पडला नाही. सिंधूने पहिला सेट 21-16 अशा फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. काही सुरेख पॉईंट मिळवत अखेरच्या क्षणात किम ह्यो मिनने सिंधूला चांगली टक्कर दिली. मात्र सिंधूने किमला सामन्यात फारसं डोकं वर काढण्याची संधी न देता पहिला सेट 21-16१६ अशा फरकाने जिंकला.दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला पहिल्या मिनीटापासूनच किमने चांगली लढत दिली. पण पहिला सेट जिंकणाऱ्या सिंधूने दुसरा सेटही21-14 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या खिशात घातला. याव्यतिरीक्त साई प्रणित, समीर वर्मा, तन्वी लाड आणि ऋतुपर्णा दास या भारतीय खेळाडूंनी आपल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकले आहेत.यंदा पहिल्यांदाच भारत सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून खेळत असून भारताची मदार पुरुष गटात श्रीकांतवर, तर महिला गटात पी. व्ही. सिंधूवर आहे. श्रीकांतने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना सर्जीचा २१-१३, २१-१२ असा ३० मिनिटांहून कमी वेळेत धुव्वा उडवला. सर्वच क्षेत्रात वर्चस्व राखताना श्रीकांतने सर्जीला पुनरागमन करण्याची एकही संधी न देताना बाजी मारली. दुसºया फेरीत श्रीकांतचा सामना फ्रान्सचा लुकास कोर्वी विरुध्द होईल.स्पेनचा प्रतिस्पर्धी पाब्लो एबियान याने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने समीरची सहज आगेकूच झाली. ज्यावेळी पाब्लोने माघार घेतली तेव्हा समीर २१-८, १७-४ असा आघाडीवर होता. महिलांमध्ये तन्वीने झुंजार खेळ करताना इंग्लंडच्या क्लो बर्चला १७-२१, २१-१०, २१-१९ असे नमवले. मिश्र दुहेरी गटात सात्विकसैराज रंकिरेड्डी आणि मनीषा के. या जोडीने ताम चुन हेई - एनजी त्सझ याऊ या हाँगकाँगच्या जोडीचा २४-२२, २१-१७ असा पाडाव केला.

 

या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघावर एक नजर  पुरुष एकेरी - श्रीकांत किदम्बी, अजय जयराम, बी.साई प्रणीत, समीर वर्मामहिला एकेरी -  पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्ण दास, तन्वी लाडपुरुष दुहेरी - मनु अत्री आणि सुमित रेड्डी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, श्लोक रामचंद्रन आणि एम.आर.अर्जुनमहिला दुहेरी - आश्विनी पुनप्पा आणि एन.सिकी रेड्डी, संजना संतोष आणि आर्थी सारा सुनील, मेघना जक्कमपुडी आणि पुर्विशा एस.राममिश्र दुहेरी- प्रणव चोप्रा आणि एन.सिकी रेड्डी, बी. सुमित रेड्डी आणि आश्विनी पुनप्पा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि के. मनिषा