जेव्हा सायना नेहवालवर ज्वाला भडकते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 16:38 IST2018-04-04T16:38:14+5:302018-04-04T16:38:14+5:30

सायनाने कुटुंबातील व्यक्तींना क्रीडाग्रामात प्रवेश न मिळाल्याबद्दल ट्विट केले होते. ज्वालाने या सायनाच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे.

When jwala fired on Saina Nehwal ... | जेव्हा सायना नेहवालवर ज्वाला भडकते तेव्हा...

जेव्हा सायना नेहवालवर ज्वाला भडकते तेव्हा...

ठळक मुद्देसायनाने जर वडिलांना जर प्रवेश दिला नाही, तर आपण खेळणार नाही, अशी धमकीच दिली होती.

नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केलेल्या एका ट्विटवर ज्वाला गट्टा चांगलीच भडकली आहे. काही तासांपूर्वी सायनाने कुटुंबातील व्यक्तींना राष्ट्रकुल येथील क्रीडाग्रामात प्रवेश न मिळाल्याबद्दल ट्विट केले होते. ज्वालाने या सायनाच्या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 

सायनाच्या वडिलांना क्रीडाग्रामात प्रवेश न दिल्यामुळे सायना चंगलीच भडकली होती. त्यावर सायनाने जर वडिलांना जर प्रवेश दिला नाही, तर आपण खेळणार नाही, अशी धमकीच दिली होती. या गोष्टीचा ज्वालाने चांगलाच समाचार घेत तिला चांगलेच सुनावले आहे.

 

 

ज्वालाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ जिथे स्पर्धा असते तिचे माझे कुटुंबियही येतात. पण ते तिकीट आणि हॉटेलचा खर्च स्वत:हून करतात. मला माहिती नाही की, वाद नेमका कोणत्या गोष्टीमुळे झाला होता. पण जेव्हा तुम्हाला बऱ्याच दिवसांपूर्वी स्पर्धा कधी होणार, हे माहिती असते तेव्हा तुम्ही तुमची व्यवस्था का करत नाहीत? मी खेळणार नाही, ही धमकी देणे किती उचित आहे? याचा विचार व्हायला हवा.“

 

सायनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “ भारतातून गोल्ड कोस्ट यथे येताना माझे वडिला भारताच्या पथकाबरोबर होते. पण येथे दाखल झाल्यावर त्यांना क्रीडाग्राममध्ये प्रवेश का देण्यात आला नाही? प्रत्येक सामन्यात मला त्यांच्या पाठिंब्याची गरज असते. त्यामुळे ते मला येथे भेटायला हवेत. “

Web Title: When jwala fired on Saina Nehwal ...