सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 03:35 IST2018-10-26T03:35:08+5:302018-10-26T03:35:16+5:30

गतविजेता किदाम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी गुरुवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Saina, Srikanth reach quarter-finals | सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

सायना, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

पॅरिस : गतविजेता किदाम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी गुरुवारी फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
श्रीकांतने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत कोरियाच्या जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या डोंग कियुनचा १२-२१, २१-१६, २१-१८ ने पराभव केला. ही लढत एक तास १३ मिनिट रंगली. सायनाने महिला एकेरीत जपानची माजी विश्व चॅम्पियन नोजोमी ओकुहाराची झुंज १०-२१, २१-१४, २१-१७ ने मोडून काढली. श्रीकांत व सायना यांना यानंतर कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. श्रीकांतची लढत माजी विश्व चॅम्पियन केंटो मोमोटासोबत, तर सायनाचा सामना चिनी तैपईची विश्व क्रमवारीतील अव्वल खेळाडू ताय ज्यू यिंगसोबत होईल.

Web Title: Saina, Srikanth reach quarter-finals