सायना नेहवालच्या लग्नाची पत्रिका झाली वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 19:46 IST2018-11-30T19:44:36+5:302018-11-30T19:46:20+5:30
सायना आणि पी.कश्यप येत्या 16 डिसेंबरला लग्न करणार आहेत. आता तर त्यांच्या लग्नाची पत्रिकाही वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Photo Courtesy: Twitter/Oldhand
नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. सायना आणि पी.कश्यप येत्या 16 डिसेंबरला लग्न करणार आहेत. आता तर त्यांच्या लग्नाची पत्रिकाही वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सायना आणि पी. कश्यप हे जवळपास दहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नव्हता. काही दिवसांपूर्वी सायनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. या दोन्ही खेळाडूंच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा विवाह सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सायना आणि पी.कश्यप यांच्या लग्नाला जवळच्या 100 लोकांना या खास विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लग्नानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सायना आणि पी. कश्यप यांच्या आधी सानिया-शोएब, दीपिका पल्लीकल-दिनेश कार्तिक, इशांत शर्मा-प्रतिमा सिंग, गीता फोगट-पवन कुमार, साक्षी मलिक-सत्यवर्त काडयान हे स्टार खेळाडू विवाहबंधनात अडकले आहेत.