सायनाचे आव्हान संपुष्टात; श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 18:59 IST2018-06-28T18:57:42+5:302018-06-28T18:59:00+5:30

भारताची फुलराणी सायना नेहवाल हीचे मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीने विजयी धडाका कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

saina nehwal loss, shrikanth in quarter | सायनाचे आव्हान संपुष्टात; श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत 

सायनाचे आव्हान संपुष्टात; श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत 

क्वालालंपूर : भारताची फुलराणी सायना नेहवाल हीचे मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर पुरूष एकेरीत श्रीकांत किदम्बीने विजयी धडाका कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सायनाला दुस-या फेरीत जपानच्या अकाने यामागुचीने सरऴ गेममध्ये 36 मिनिटांत पराभूत केले. यामागुचीने ही लढत 21-15, 21-13 अशी जिंकली. यामागुचीने या निकालासह सायनाविरुद्धची जय-पराजयाची आकडेवारी 6-1 अशी वाढवली आहे.

दुसरीकडे श्रीकांतने चायनीज तैपेइच्या वेई झु वांगचा 22-20, 21-12 असा संघर्षपूर्ण विजय मिऴवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याला फ्रांसच्या  ब्रिस लेव्हेर्डेझचा सामना करावा लागणार आहे. 

Web Title: saina nehwal loss, shrikanth in quarter