Saina Nehwal has tied the knot with fellow badminton star Parupalli Kashyap | 'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न

'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅटमिंटनपटू सायना नेहवाल आज विवाह बंधनामध्ये अडकली. भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपबरोबर सायनाचा आज विवाह संपन्न झाला. हे दोघेही दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण यावर्षी त्यांनी याबाबतचा खुलासा केला.
सायना आणि कश्यप ही जोडी १६ डिसेंबरला लग्न करणार, असे वृत्त आले होते. पण सायनाने आम्ही १४ डिसेंबरला लग्न करत आहोत, असे ट्विटरवर जाहीर केले होते. सायना आणि पी.कश्यप यांच्या लग्नाला जवळच्या 100 लोकांना या खास विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच लग्नानंतर पाच दिवसांनी म्हणजेच रिसेप्शन सोहळा होणार आहे. 

सायना नेहवालच्या लग्नाची पत्रिका झाली होती वायरल
सायना आणि पी.कश्यप यांचे १४ डिसेंबरला लग्न झाले. पण यापूर्वी त्यांच्या लग्नाची पत्रिकाही वायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. सायना आणि पी. कश्यप हे जवळपास दहा वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनी कधीही आपल्या नात्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नव्हता. काही दिवसांपूर्वी सायनाने पी. कश्यपसोबत शेअर केलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला होता. 

Web Title: Saina Nehwal has tied the knot with fellow badminton star Parupalli Kashyap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.