भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 09:26 IST2018-05-30T09:26:39+5:302018-05-30T09:26:39+5:30
भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून.

भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट
नवी दिल्ली - भारताची फुलराणी सायना नेहवाल तिच्या जबरदस्त खेळामुळे नेहमीच चर्चेत असते. आता मात्र सायना वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. ही चर्चा सुरू झाली आहे ती सायनाच्या इस्टाग्रामवरील फोटोंवरून. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. सायना आणि कश्यपचे एकमेकांसोबतचे फोटो पाहून दोघांच्याही चाहत्यांनी तर्तवितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे. तसेच सायना आणि पारुपल्ली कश्यप हे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचेही बोलले जात आहे.
ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेती सायना आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पारुपल्ली कश्यप यांच्यातील नात्याची खूप दिवसांपासून चर्चा होती. प्रशिक्षक गोपीचंद यांचे दोघेही शिष्य. त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वर्षांपासून मैत्री आहे. या नात्याचे रुपांतर आता विवाहबंधनात व्हावे, अशी इच्छाही दोघांच्या चाहत्यांनी व्यक्त केली मात्रा या दोघांचेही याआघीचे फोटो हे मित्रमैत्रिणींसोबत असायचे. मात्र आता समोर आलेल्या फोटोंमध्ये काहीतरी खास आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. ‘तुम्ही दोघे एकमेकांसाठी अगदी अनुरुप आहात’, असे चाहत्यांनी म्हटले आहे.
विशेष बाब म्हणजे सायना आणि कश्यपचे प्रशिक्षक असलेल्या पुलैला गोपिचंद यांची प्रेमकहाणीसुद्धा अशीच चर्चेचा विषय ठरली होती.