सायना उपांत्यपूर्व फेरीत; समीर वर्माचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 03:51 IST2018-09-27T03:51:38+5:302018-09-27T03:51:42+5:30

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी आगेकूच करताना सायना नेहवालने बुधवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि वैष्णवी यांना पराभव स्वीकारावा लागला.

 Saina enters quarterfinals | सायना उपांत्यपूर्व फेरीत; समीर वर्माचा पराभव

सायना उपांत्यपूर्व फेरीत; समीर वर्माचा पराभव

सोल : कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी आगेकूच करताना सायना नेहवालने बुधवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष एकेरीत समीर वर्मा आणि वैष्णवी यांना पराभव स्वीकारावा लागला.
सायना नेहवाल हिने एकतर्फी झालेल्या सामन्यात कोरियाच्या किम ह्यो मीन हिला सरळ गेममध्ये २१-१२, २१-११ असे पराभूत केले.
पाचव्या मानांकित भारतीय स्टार सायना ही पुढच्या फेरीत स्थानिक क्वालिफायर खेळाडू किम गा युन हिच्यासोबत भिडेल.
स्विस ओपन चॅम्पियन समीर वर्मा आणि वैष्णवी रेड्डी जक्का यांना पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबाद ओपनचे विजेतेपद मिळवणाऱ्या समीरला डेन्मार्कच्या अँडर्स एंटोनसनविरोधात पुरुष एकेरीत २१-१५, १६-२१, ७-२१ असा पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, वैष्णवी हिला महिला एकेरीत अमेरिकेच्या सहाव्या मानांकित बेईवान झिंगकडून १०-२१, ९-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.
सायना हिला पहिल्या फेरीत फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. तिने दुसºया गेममध्ये १८-१० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सहजतेने गेम आणि सामना जिंकला. (वृत्तसंस्था)

Web Title:  Saina enters quarterfinals