शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पीबीएल; पी.व्ही सिंधूचा 'निन्जा वॉरीयर'वर विजय, ताय त्जु यिंग पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 9:04 PM

प्रीमीयर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लढतीत भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि निन्जा वॉरीयर ताय त्जु यिंग यांच्यातील चुरशीच्या लढतीत १५-११, १०-१५, १५-१२ असा विजय मिळवला.

- आकाश नेवे

चेन्नई- प्रीमीयर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लढतीत भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि निन्जा वॉरीयर ताय त्जु यिंग यांच्यातील चुरशीच्या लढतीत  १५-११, १०-१५, १५-१२ असा विजय मिळवला.चेन्नईतील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडिअममध्ये झालेल्या या लढतीतील पहिला गेम खुपच चुरशीचा ठरला. अहमदाबाद संघातील सहकारी एच.एस.प्रणॉय याने निन्जा वॉरीयर म्हणून गौरवलेल्या ताय त्जु यिंग हिने सामन्यातील या गेमची सुरूवात जोरदार केली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या सिंधुला तीने मागे टाकले.सलग तीन गुण घेतले. सिंधुच्या चुकीने यींगला पाचवा गुण देखील बहाल केला. एकवेळ सिंधू १०-६ अशी मागे होती. मात्र सिंधूने सलग पाच गुण घेत यिंगवर दडपण आणले आणि ११-११ अशी बरोबरी साधली. नंतर सलग चार गुण घेत गेम आपल्या नावावर केला.

दुसरा गेम सिंधूसाठी फारसा लाभदायी ठरला नाही. या गेममध्ये सिंधू सुरूवातीपासूनच पिछाडीवर होती. यिंग हिने वेगवान खेळी करत सिंधूला १५-१० असे पराभूत करत सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये नेला. या गेममध्ये यिंग हिने आपल्या दमदार स्मॅशच्या जोरावर सिंधूविरोधात गुणांची कमाई केली.

तिसऱ्या गेममध्ये काही चांगल्या रॅलीज् रंगल्या. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपला अनुभव पणाला लावला.  रंगलेल्या रॅली सिंधू हिने गुण मिळवत १२-१० अशी आघाडी घेतली मात्र यिंग हिने नंतर सलग दोन गुण मिळवत १२-१२ अशी बरोबरी साधली. मात्र सिंधू हिने दमदार खेळी करताना सलग तीन गुण घेत विजय नोंदवला.

पुरूष दुहेरीच्या पहिल्या लढतीत अहमदबाद स्मॅश मास्टर्सच्या किदाम्बी नंदगोपाल आणि लीन चु हेई यांनी चेन्नईच्या ख्रिस अॅडकॉक आणि ली यांग यांचा १५-१३, १५-१२ असा पराभव केला. अहमदबाद स्मॅश मास्टर्सच्या सौरभ वर्मा याने िब्रस लेव्हरडेज याला१२-१५,१५-१४, १५-१२ असे पराभूत केले.मिश्र दुहेरीच्या सामन्यात चेन्नईच्या सिंधू आणि बी.सुमित रेड्डी यांनी अहमदबादच्या कामिला रेटर झुल आणि ली चुन हेई रेगीनाल्ड यांना १५-१४,१५-१३ असे पराभूत केले.प्रणॉय पराभूतचेन्नईच्या तान्सोंगास्क साएनसोमबुनुस्क  याने अहमदाबाद स्मॅश मास्टर्सचा एचएस प्रणॉय याला १०-१५, १५-१२,१५-१४ असे पराभूत केले. या सामन्यातील तिसरा गेम चुरशीचा ठरला. प्रणॉय याने १४-११ अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर  तान्सोंगास्क याने सलग तीन गुण घेत प्रणॉयला पराभवाचा धक्का दिला. अखेरच्या गुणासाठी दोघांमध्ये रॅली जोरदार रंगली. मात्र तान्सोंगास्क याने एक अप्रतिम स्मॅश मारत चेन्नईला विजय मिळवून दिला.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton