शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:55 IST

जिल्हाभरातील संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हाभरातील संत गजानन महाराज मंदिरात शनिवारी ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.शहरातील स्रेहशारदा नगरात प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शनिवारी दुपारी १२ वाजता श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. तत्पूर्वी ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. गुलालाची उधळण करीत आणि ‘गण गण गणात बोते’चा जयजयकार करीत प्रकट दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.त्याचप्रमाणे एकता कॉलनीतील गजानन महाराज मंदिर, शास्त्रीनगर, सिंचननगर या ठिकाणीही प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात प्रकट दिनानिमित्त १३ ते १५ फेब्रुवारी या काळात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आत्मोन्नती मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. संतकवी दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण तसेच प्रवचनाचे कार्यक्रम पार पडले. या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीGajanan Maharajगजानन महाराज