शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 03:52 IST

भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.

क्वालालम्पूर : भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्य विजेता बी. साईप्रणीत व किदाम्बी श्रीकांत हे सलामीलाच पराभूत झाले. एच. एस. प्रणॉयने मात्र विजयी सलामी दिली.माजी विश्वविजेती सिंधूने पहिल्या फेरीत रशियाची येवगेनिया कोसेत्सकाया हिचा केवळ ३५ मिनिटांच्या खेळात २१-१५,२१-१३ ने पराभव केला. सायनाने बेल्जियमची लियाने टेनवर केवळ ३६ मिनिटात २१-१५, २१-१७ असा विजय नोंदविला. आता सायना- सिंधू दुसऱ्या फेरीत भिडतील. दोघी मागील काही महिन्यांपासून ‘आॅफ फॉर्म’ आहेत. अनेक स्पर्धांमध्ये दोघींना सुरुवातीच्या फेरीत पराभूत व्हावे लागले. पुढचा सामना या दोघींमध्येच होणार असल्याने पुन्हा एकदा दोघींपैकी एकीला स्पर्धेच्या सुरुवातीलाच गाशा गुंडाळावा लागेल.दुसरीकडे, प्रनॉयने सलामीला केंटा सुनेयामाला २१-९, २१-१७ असे नमविले. साईप्रणीतचा डेन्मार्कचा रासमुस गेमकेकडून ११-२१, १५-२१ असा पराभव झाला. श्रीकांत दुसरा मानांकित चायनीज तैपेईचा चाऊ टीएन चेन याच्याकडून १७-२१, ५-२१ असा पराभूत झाला.

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालPV Sindhuपी. व्ही. सिंधू