शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

इंडिया ओपन बॅडमिंटन : कार्तिकेय, श्रेयांश, आकर्षी, रिया यांचा मुख्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:37 AM

कार्तिकेय गुलशनकुमार, श्रेयांश जैस्वाल यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात आकर्षी कश्यप व रिया मुखर्जी यांनी मुख्य फेरी गाठली.

नवी दिल्ली : कार्तिकेय गुलशनकुमार, श्रेयांश जैस्वाल यांनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला गटात आकर्षी कश्यप व रिया मुखर्जी यांनी मुख्य फेरी गाठली.कार्तिकेयने पात्रता फेरीत अनुभवी सिरिल वर्माला पराभूत केल्यानंतर दुसºया फेरीत बोधित जोशीवर मात केली. मुख्य फेरीत त्याची लढत शुभंकर डे याच्याशी होणार आहे.श्रेयांकने दोन्ही फेरीतील सामने सहज जिंकले. त्याने पहिल्या फेरीत रंजन राजा रंजनला तर दुसºया फेरीत अभिषेक येलगर याला पराभूत केले. मुख्य फेरीत मात्र त्याची लढत सोपी असणार नाही. त्याची लढत एच. एस. प्रणयशी होणार आहे. पुरुष एकेरीत मलेशियाच्या डेरेन ल्यू व जुल्करनैन यांनीही मुख्य फेरीत प्रवेश केला.महिला गटात अग्रमानांकित रुषाली गुम्मादी व इरा शर्मा यांना पराभवाचा धक्का बसला. रुषालीला आकर्षीने तर इराला रियाने पराभूत करत मुख्य फेरी गाठली. रियाची लढत स्पेनच्या बिटरिज कोरालेसबरोबर, तर ्र्रआकर्षीची लढत अनुरा प्रभुदेसाईशी होणार आहे.पुरुष व महिलांच्या एकेरीमध्ये भारताचा संघ बलाढ्य असून भारताचे प्रतिनिधित्व के. श्रीकांत, प्रणय, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल हे खेळाडू करणार आहेत. पुरुषांच्या दुहेरीमध्ये तुषार शर्मा व चंद्रभूषण त्रिपाठी, कृष्णा प्रसाद गरागे व धु्रव कपिला, एल्विन फ्रान्सिस व के. नंदगोपाल, रोहन कपूर व शिवम शर्मा याजोडींनी मुख्य फेरीत प्रवेश केलाआहे. महिला दुहेरीमध्ये शेनन ख्रिस्तियन व रिया गज्जर , रितुपर्णा पांडा व मिथिला युके या जोडीनेमुख्य फेरी गाठली. मिश्र दुहेरीत भारताच्या सर्व आठही जोडींनी मिश्र दुहेरीत प्रवेश केला.

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत