शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

भारतीय संघ मलेशियाकडून पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 5:02 AM

सुदीरमन कप बॅडमिंटन : पुढील सामन्यात चीनविरुद्ध विजय आवश्यक

नानिंग : भारताला सुदीरमन मिश्र टीम चॅम्पियनशिपच्या ‘ड’ गटातील सामन्यात मलेशियाने ३-२ ने पराभूत केले. या निकालामुळे भारताच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.

सात्विक साईराज रांकीरेड्डी व अश्विनी पोनप्पाने शानदार कामगिरी करीत मलेशियाच्या गोह सूप हुआत व लाई शेवोन जेमी यांचा १६-२१, २१-१७, २४-२२ ने पराभव करीत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतच्या स्थानी समीर वर्माला खेळविण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. वर्माला ली जी जियाने ४८ मिनिटांमध्ये २१-१३, २१-१५ ने पराभूत केले.

आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधूने गोह जिन वेईला ३५ मिनिटांमध्ये २१-१२, २१-८ ने पराभूत केले. त्यानंतर दुहेरीत मनू अत्री व बी. सुमित रेड्डी यांना आरोन चिया व टियो ई यी यांच्याविरुद्ध २२-२०, २१-१९ ने पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर अश्विनी पुन्हा एकदा मैदानात उतरली आणि एन. सिक्की रेड्डीच्या साथीने महिला दुहेरीत अंतिम फेरीत खेळली. मात्र त्यांना जागतिक क्रमवारीतील १३ व्या क्रमांकाची जोडी चोऊ मेई कुआन व ली मेंग यिआन यांच्याविरुद्ध २१-११, २१-१९ ने पराभव स्वीकारावा लागला.

भारतीय संघाला यानंतरच्या लढतीत बुधवारी चीनविरुद्ध खेळावे लागले. हा सामन गमावल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. चीन संघात आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेई व जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू शि युकी यांचा समावेश आहे. भारतीय संघाने २०११ व २०१७ मध्ये या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. (वृत्तसंस्था)