शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

एच. एस. प्रणॉयचा धमाकेदार विजय, अहमदाबाद स्मॅश मास्टर्सची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 8:56 PM

अहमदबाद स्मॅश मास्टर्सचा एच. एस. प्रणॉय याने मुंबई रॉकेट्सच्या सान वोन हो याच्यावर १५-१२, १५-१२ असा विजय मिळवला. त्यासोबतच अहमदाबादने दोन गुणांची आघाडी घेतली आहे.

- आकाश नेवेचेन्नई- अहमदबाद स्मॅश मास्टर्सचा एच. एस. प्रणॉय याने मुंबई रॉकेट्सच्या सान वोन हो याच्यावर १५-१२, १५-१२ असा विजय मिळवला. त्यासोबतच अहमदाबादने दोन गुणांची आघाडी घेतली आहे.येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडिअममध्ये झालेल्या लढतीत पहिला गेम प्रणॉय याने सहज जिंकला. या गेममध्ये त्याने आपले कौशल्य दाखवत १५-१२ असा विजय मिळवला. मात्र दुसरा गेम त्याच्यासाठी कठीण ठरला. सान वोन हो याने ११-८ अशी आघाडी घेतली होती. मात्र प्रणॉय याने सलग चार गुण घेत १२-११ अशी आघाडी घेतली. प्रणॉयच्या काही दमदार स्मॅश पुढे सान वोनचे चालले नाही. अखेरीस दुसऱ्या गेममध्ये प्रणॉयने विजय मिळवला. प्रणॉय आणि सान वोनमधअये रॅली चांगल्या रंगल्या. मात्र विश्व रँकिंगमध्ये दहाव्यास्थानावर असलेल्या प्रणॉय याने रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या सान वोला पराभूत केले.

मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात अहमदाबाद स्मॅश मास्टर्सच्या कॅमिला रिटर जुल आणि लॉ चेऊक हीम यांनी मुंबई रॉकेट्सच्या गॅर्‌बिएला स्टोइवा आणि ली योंग डाई यांना १५-११, १५-७ असे पराभूत केले. या लढतीवर कॅमिला आणि लॉ चेऊक यांनी वर्चस्व राखले. पहिल्या गेममध्ये स्टोइवा आणि ली योंग यांनी काहीसा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या गेममध्ये त्यांचे नियंत्रणच राहिले नाही. त्यांच्यातील असमन्वयाचा फटका त्यांना बसला.

टॅग्स :BadmintonBadminton