शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी, लक्ष्य यांचा बॅडमिंटन सराव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:00 IST

कोरोनामुळे सर्व खेळाडू दोन महिने घरीच बंदिस्त होते. साईने मागच्या महिन्यात सराव सुरू करण्यासंदर्भात दिशानिर्देश दिल्यानंतर खेळाडूंना पुन्हा कोर्र्टवर परतणे शक्य झाले आहे.

नवी दिल्ली : आघाडीचे बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन यांच्यासह २० खेळाडूंनी कोरोना लॉकडाऊननंतर पुन्हा बेंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत सराव सुरू केला आहे.

कोरोनामुळे सर्व खेळाडू दोन महिने घरीच बंदिस्त होते. साईने मागच्या महिन्यात सराव सुरू करण्यासंदर्भात दिशानिर्देश दिल्यानंतर खेळाडूंना पुन्हा कोर्र्टवर परतणे शक्य झाले आहे. अकादमीचे मुख्य कोच आणि संचालक विमल कुमार म्हणाले, ‘काही आघाडीचे राष्टÑीय खेळाडू मागच्या दोन आठवड्यापासून येथे सराव करीत आहेत. आमच्याकडे १६ कोर्ट आहेत, जवळपास २० खेळाडू सरावात सहभागी असून सर्वांसाठी वेगवेगळ्या वेळा ठरवण्यात आल्या आहेत.’ एकूण ६५ पैकी बरेचशे खेळाडू सध्या शहरात नाहीत, मात्र ते येथे येण्यास आणि सराव करण्यास उत्सुक असल्याची माहिती विमलकुमार यांनी दिली.

सध्याचा सराव केवळ ऐच्छिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भारताचे प्रतिनिधित्व करणारा मिथुन मंजुनाथ, बी. एम. राहुल भारद्वाज तसेच मेसनाम मेहराबा हेदेखील सराव करीत आहेत. दीर्घकाळ सराव आणि सामन्यांपासून दूर राहिलेल्या खेळाडूंना सूर गवसण्यास किमान सहा आठवडे लागतील, असे विमल यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘गेली दोन महिने सरावास मुकलेले हे खेळाडू ३० ते ४० टक्के तरबेजपणा गमावू शकतात.अकादमीत जे खेळाडू सरावात व्यस्त आहेत त्यात राष्टÑकुल स्पर्धेत तीनवेळा पदक विजेती दुहेरीची खेळाडू अश्विनी पोनप्पा, जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर राहिलेला अजय जयराम आणि मागच्या सत्रात पाच स्पर्धा जिंकणारा लक्ष्य सेन यांचा समावेश आहे.