शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मला लगीन कराव पाहिजे, सिंधूच नवरी पाहिजे; ७० वर्षांच्या आजोबांची अजब इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 17:40 IST

लग्नाची इच्छा व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

चेन्नई: वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला एका व्यक्तीनं लग्नासाठी मागणी घातली आहे. माझं आणि सिंधूचं लग्न लावून द्या. अन्यथा मी तिचं अपहरण करेन, अशी धमकी मागणी घालणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती ७० वर्षांची आहे. यासाठी या व्यक्तीनं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. मलाईसामी असं या व्यक्तीचं नाव आहे. तमिळनाडूच्या रामनाथपुरमचे रहिवासी असणाऱ्या मलाईसामी यांनी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी या इच्छेचा उल्लेख केला आहे. 'माझ्या लग्नासाठी आवश्यक तयारी न केल्यास मी सिंधूचं अपहरण करेन,' अशी धमकीच मलाईसामी यांनी दिली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात मलाईसामी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी लग्नाची इच्छा व्यक्त करत त्याबद्दलचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं.  जिल्हाधिकाऱ्यांच्या जनता दरबारात मलाईसामी यांनी सिंधूच्या फोटोसह एक पत्र आणलं होतं. याशिवाय त्यांनी स्वत:चादेखील फोटो आणला होता. सिंधूसोबत लग्न करण्याची इच्छा त्यांनी पत्रात व्यक्त केली होती. मी ७० वर्षांचा नसून माझं वय फक्त १६ वर्षे आहे. माझा जन्म ४ एप्रिल २००४ झाला आहे. सिंधूनं तिच्या कारकिर्दीत साधलेली प्रगती अतिशय उत्तम आहे. त्यामुळेच ती माझ्या आयुष्याची जोडीदार व्हावी, असं मला वाटतं, असं मलाईसामींनी पत्रात म्हटलं आहे.  

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonmarriageलग्न