70 year old wants to marry PV Sindhu files petition | मला लगीन कराव पाहिजे, सिंधूच नवरी पाहिजे; ७० वर्षांच्या आजोबांची अजब इच्छा
मला लगीन कराव पाहिजे, सिंधूच नवरी पाहिजे; ७० वर्षांच्या आजोबांची अजब इच्छा

चेन्नई: वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला एका व्यक्तीनं लग्नासाठी मागणी घातली आहे. माझं आणि सिंधूचं लग्न लावून द्या. अन्यथा मी तिचं अपहरण करेन, अशी धमकी मागणी घालणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती ७० वर्षांची आहे. यासाठी या व्यक्तीनं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. मलाईसामी असं या व्यक्तीचं नाव आहे. 

तमिळनाडूच्या रामनाथपुरमचे रहिवासी असणाऱ्या मलाईसामी यांनी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसोबत लग्न करण्याची इच्छा आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी या इच्छेचा उल्लेख केला आहे. 'माझ्या लग्नासाठी आवश्यक तयारी न केल्यास मी सिंधूचं अपहरण करेन,' अशी धमकीच मलाईसामी यांनी दिली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात मलाईसामी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी लग्नाची इच्छा व्यक्त करत त्याबद्दलचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं.  

जिल्हाधिकाऱ्यांच्या जनता दरबारात मलाईसामी यांनी सिंधूच्या फोटोसह एक पत्र आणलं होतं. याशिवाय त्यांनी स्वत:चादेखील फोटो आणला होता. सिंधूसोबत लग्न करण्याची इच्छा त्यांनी पत्रात व्यक्त केली होती. मी ७० वर्षांचा नसून माझं वय फक्त १६ वर्षे आहे. माझा जन्म ४ एप्रिल २००४ झाला आहे. सिंधूनं तिच्या कारकिर्दीत साधलेली प्रगती अतिशय उत्तम आहे. त्यामुळेच ती माझ्या आयुष्याची जोडीदार व्हावी, असं मला वाटतं, असं मलाईसामींनी पत्रात म्हटलं आहे. 
 


Web Title: 70 year old wants to marry PV Sindhu files petition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.