शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:09 IST

Yamaha भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रण शेअर केले आहे.

Yamaha भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रण शेअर केले आहे. अर्थात यात इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्यासाठीचा कोणताही उल्लेख अद्याप करण्यात आलेला नाही. 11 एप्रिल रोजी यामाहाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचं समजतं. यासाठीचं आमंत्रण देखील तयार करण्यात आलं आहे. टीझरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाचा उल्लेख नाही. "यामाहाला एक स्टायलिश, स्पोर्टी आणि रोमांचक नवीन भविष्य आणण्यासाठी आम्ही एकत्र येत असताना आमच्यात सामील व्हा.", असं टीझरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

टीझरमध्ये "द कॉल ऑफ द ब्लू" असेही लिहिले आहे. जरी हे इलेक्ट्रिक वाहनांचे थेट चिन्ह नसले तरी, निळा रंग बहुतेक वेळा इलेक्ट्रिसिटी आणि प्रकाशाशी संबंधित असतो. 

Yamaha भारतात कोणती स्कूटर लॉन्च करू शकते?Yamaha ने भारतीय बाजारात आधीच E01 सारखी नावे नोंदवली आहेत. जपानी दुचाकी निर्माती कंपनी नुकतीच युरोपियन बाजारपेठेत लॉन्च केलेली इलेक्ट्रिक स्कूटर निओ देखील लॉन्च करू शकते. कंपनीने ही स्कूटर आसियान देशांमध्ये लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. तथापि, भारताच्या लाँचचा कोणताही विशिष्ट उल्लेख नव्हता. निओ ही एक छोटी स्कूटर आहे जी 50cc ICE स्कूटरच्याच सेगमेंटमध्ये असेल. नवीन EV सुमारे 37 किमीच्या रेंजसह येते. स्कूटर बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

एथर आणि ओला इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेलदोन स्कूटरपैकी E01 अधिक शक्तिशाली आहे. E01 125cc स्कूटरच्या सेगमेंटच्या बरोबरीने असेल. हे नवीन उत्पादन Ather 450 सीरिज आणि Ola S1 शी स्पर्धा करण्यास सक्षम असेल. दरम्यान, रेंज खूप कमी असू शकते. अधिकाधिक स्पर्धकांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यामुळे, यामाहा सारख्या कंपनीनं बाजारात प्रवेश करणं अर्थपूर्ण आहे. हा ब्रँड त्याच्या परफॉर्मेंनस हेवी प्रोडक्टसाठी लोकप्रिय आहे. EV सेगमेंट परफॉर्मन्सही भारतात आता मजबूत होऊ लागला आहे.

टॅग्स :yamahaयामहाAutomobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर