Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 08:09 PM2022-03-15T20:09:14+5:302022-03-15T20:09:43+5:30

Yamaha भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रण शेअर केले आहे.

Yamaha may launch new electric scooter in India next month know details | Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

Next

Yamaha भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात एका कार्यक्रमासाठी आमंत्रण शेअर केले आहे. अर्थात यात इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्यासाठीचा कोणताही उल्लेख अद्याप करण्यात आलेला नाही. 11 एप्रिल रोजी यामाहाकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचं समजतं. यासाठीचं आमंत्रण देखील तयार करण्यात आलं आहे. टीझरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाचा उल्लेख नाही. "यामाहाला एक स्टायलिश, स्पोर्टी आणि रोमांचक नवीन भविष्य आणण्यासाठी आम्ही एकत्र येत असताना आमच्यात सामील व्हा.", असं टीझरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 

टीझरमध्ये "द कॉल ऑफ द ब्लू" असेही लिहिले आहे. जरी हे इलेक्ट्रिक वाहनांचे थेट चिन्ह नसले तरी, निळा रंग बहुतेक वेळा इलेक्ट्रिसिटी आणि प्रकाशाशी संबंधित असतो. 

Yamaha भारतात कोणती स्कूटर लॉन्च करू शकते?
Yamaha ने भारतीय बाजारात आधीच E01 सारखी नावे नोंदवली आहेत. जपानी दुचाकी निर्माती कंपनी नुकतीच युरोपियन बाजारपेठेत लॉन्च केलेली इलेक्ट्रिक स्कूटर निओ देखील लॉन्च करू शकते. कंपनीने ही स्कूटर आसियान देशांमध्ये लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. तथापि, भारताच्या लाँचचा कोणताही विशिष्ट उल्लेख नव्हता. निओ ही एक छोटी स्कूटर आहे जी 50cc ICE स्कूटरच्याच सेगमेंटमध्ये असेल. नवीन EV सुमारे 37 किमीच्या रेंजसह येते. स्कूटर बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते.

एथर आणि ओला इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल
दोन स्कूटरपैकी E01 अधिक शक्तिशाली आहे. E01 125cc स्कूटरच्या सेगमेंटच्या बरोबरीने असेल. हे नवीन उत्पादन Ather 450 सीरिज आणि Ola S1 शी स्पर्धा करण्यास सक्षम असेल. दरम्यान, रेंज खूप कमी असू शकते. अधिकाधिक स्पर्धकांनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यामुळे, यामाहा सारख्या कंपनीनं बाजारात प्रवेश करणं अर्थपूर्ण आहे. हा ब्रँड त्याच्या परफॉर्मेंनस हेवी प्रोडक्टसाठी लोकप्रिय आहे. EV सेगमेंट परफॉर्मन्सही भारतात आता मजबूत होऊ लागला आहे.

Web Title: Yamaha may launch new electric scooter in India next month know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.