शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रेट्रो-लुक असलेली Yamaha FZ-X भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 16:28 IST

Yamaha FZ-X : ही बाईक FZS V3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. पाहा किती आहे किंमत.

ठळक मुद्देYamaha FZ-X : ही बाईक FZS V3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.बाईकमध्ये देण्यात आले आहेत अनेक जबरदस्त फीचर्स

जपानची दुचाकी उत्पादक कंपनी यामाहानं भारतात आपली रेट्रो स्टाईल मोटरसायकल Yamaha FZ-X लाँच केली आहे. ही Yamaha FZ पेक्षा थोडी प्रीमिअम बाईक आहे. नव्या बाईकचं डिझाईन कंपनीच्या थोडं Yamaha XSR 155 प्रभावित असल्यासारखं दिसून येतं. तसंच ही बाईक FZS V3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीनं एक भारी ऑफर आणली असून 1 हजार रूपयांत ही बाईक बूक करता येणार आहे. 

1 हजारांत बुकिंगकंपनीच्या डीलर्सनं FZ-X बाईकसाठी बुकिंग प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सुरुवातील ग्राहकांकडून 1 हजार ते 5 हजार रूपयांची बुकिंग अमाऊंट घेतली जात आहे. कंपनीनं 150 ते 200 सीसीच्या सेकमेंटमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही बाईक 150cc मध्ये आणली आहे. यामध्ये कंपनी यापूर्वी  FZ, FZS आणि MT15 सारख्या बाईक्सची विक्री करत होती. FZ-X च्या स्टँडर्ड व्हर्जनची किंमत 1.17 लाख रूपये, तर अॅक्सेसरीज व्हर्जनची किंमत 1.20 लाख रूपये इतकी आहे. 

जबरदस्त इंजिन FZ-X रेट्रो स्टाईल बाईकमध्ये कंपनीनं 149 सीसीचं सिंगल सिलिंडर, एअर कुल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 7,250rpm वर 12bhp ची पॉवर आणि 5,500rpm वर 13.3Nm चं टॉर्क जेनरेट करतं. इंजिन 5 स्पीड गियरबॉक्ससोबत जोडलेलं आहे. यामध्ये सिंगच चॅनल एबीएस सिस्टमही देण्यात आलं आहे. 

जबरदस्त फीचर्सYamaha च्या या बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एलईडी हेडलँप, डिजिटल इन्स्ट्रूमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, साईड स्टँड इंजिन किल स्विच, अपवेस्ट एक्झॉस्ट, फ्लॅट सीट, मोबाईल चार्जिंग सॉकेट, ब्लॉक पॅटर्न टायर, स्लीक एलईडी टेल लँप आणि Yamaha ConnectX सारखे मोबाईल फीचर्स दिले आहेत. ही बाईक मॅट ब्लू, मॅट ब्लॅक आणि मॅट कॉपर या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

टॅग्स :yamahaयामहाbikeबाईकIndiaभारतAutomobileवाहन