शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य...KTM ची सीट नसलेली स्कूटर; उभे राहून चालवायची...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 11:45 IST

सीट नसलेल्या स्कूटरचा कधी विचारही केला नसेल पण केटीएमने अशी स्कूटर प्रत्यक्षात आणली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर इलेक्ट्रीक असणार आहे. 

धूम बाईकमध्ये भारतात धुमाकूळ घातलेल्या KTM या कंपनीने अफलातून प्रयोग केला आहे. सीट नसलेल्या स्कूटरचा कधी विचारही केला नसेल पण केटीएमने अशी स्कूटर प्रत्यक्षात आणली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर इलेक्ट्रीक असणार आहे. 

केटीएमच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला नुकतेच ट्रायल घेताना पाहिले गेले आहे. जी आपल्या वेगळ्या लूकसाठी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या स्कूटरमध्ये खास बात म्हणजे या स्कूटरला उभे राहून चालवावे लागणार आहे. या स्कूटरला कंपनीने व्हाईट आणि ब्ल्यू या रंगांच्या मिलाफात दाखविले आहे. पुढील बाजुला मोठे चाक तर मागील बाजुला छोटेसे चाक लावण्यात आले आहे. 

उजव्या बाजुला एक बेल्ट असून तो एनर्जी रिकव्हरी प्रणालीशी जोडलेला असतो. तसेच फुल्ली डिजिटल TFT इंस्ट्रुमेंट क्लस्टर हँडल बारवर जोडलेला आहे. हा डिस्प्ले कलर डिस्प्लेही असण्याची शक्यता आहे जो केटीएम 390 ड्यूक मध्ये आहे. 

केटीएमच्या या बाईकमध्ये बॅटरी चपटी वापरण्यात आल्याची शक्यता असून ती फ्लोअर बोर्डमध्ये असण्याची शक्यता आहे. जशी हार्ले डेव्हिडसनच्या स्कूटरमध्ये पाहायला मिळाले होते. इलेक्ट्रीक मोटर मागील चाकाच्या डाव्या बाजुला देण्यात आली आहे. मात्र, ही स्कूटर भारतात येण्याची शक्यता कमीच आहे. 

केटीएम जरी इलेक्ट्रीक वाहनांमध्ये येत नसली तरीही 2013 मध्ये टोकियो मोटर शोमध्ये स्पीड दाखविण्यात आली होती, जीने खूप प्रसिद्धीही मिळविली होती. केटीएमने ई-स्पीडला खासकरून शहरी कॉम्प्यूटर बाईक म्हणून लाँच केले होते. झिरो इमिशन करणाऱ्या या स्कूटरमध्ये पावरफूल इलेक्ट्रीक मोटर आहे. जे 15 पीएसची ताकद आणि 36 एनएमचा टॉर्क प्रदान करते. 

ई स्पीडची टॉप स्पीड 80 किमी आहे. फुल चार्ज केल्यावर ती 64 किमी धावते. 4.36 कीलोवॉटची बॅटरी देण्यात आली असून पूर्ण चार्ज करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. दोन्ही चाकांना 220 एमएमचे डिस्क ब्रेक लावलेले आहेत. 

भारतात येत्या काळात इलेक्ट्रीक वाहनांचे पर्व सुरु होणार आहे. यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्र सरकारने योजनाही आणली आहे.

केवळ 30 रुपयांत 22 किमी चालवा इलेक्ट्रीक कार; पंतप्रधान मोदींची मंजुरी

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईक