नवी दिल्ली: ऑटोमोबाइल उद्योगात सध्या मोठी बातमी समोर येत आहे. आधीपासून असलेल्या चीनच्या कंपन्यांना फारसे दिवे लावता आलेले नसताना चीनमधील चौथी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Chery ने भारतीय बाजारात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत एका एसयुव्हीच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहेत. यामुळे चेरीच्या भारतात येण्यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
चेरीने अद्याप भारतीय बाजारात येण्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतू, कारचे डिझाईन पेटंटसाठी दाखल केल्याने यावर शिक्कामोर्तब होत आहे. Tiggo 8 ही कंपनीची फ्लॅगशिप एसयूव्ही असून, तिचा डिझाइन आणि आकार Hyundai Tucson आणि Jeep Meridian सारख्या प्रीमियम एसयुव्ही सारखा आहे.
Chery Tiggo 8 मध्ये मोठी अष्टकोनी ग्रिल, एलईडी हेडलाइट्स आणि इंटीग्रेटेड एलईडी डीआरएल (DRL) सारखे डिझाइन फीचर्स असतील. या गाडीला 19-इंच अलॉय व्हील्स, बॉडी-कलर्ड डोअर हँडल्स आणि एक स्लोपिंग रूफलाइन असणार आहे. गाडीची लांबी 4.7 मीटर आणि व्हीलबेस 2.7 मीटर आहे, ज्यामुळे ती तिच्या प्रतिस्पर्धकांपेक्षा मोठी आणि अधिक प्रशस्त असेल.
Web Summary : Chinese automaker Chery, fourth largest in China, plans India entry. They've patented the Tiggo 8 SUV design, hinting at a launch. The SUV boasts premium features and spacious interiors, rivaling Hyundai Tucson. Official confirmation from Chery is awaited.
Web Summary : चीन की चौथी सबसे बड़ी ऑटो कंपनी चेरी की भारत में एंट्री की तैयारी। टिग्गो 8 एसयूवी के डिज़ाइन का पेटेंट कराया, लॉन्च की अटकलें। एसयूवी में प्रीमियम फीचर्स और बड़ा इंटीरियर, हुंडई टक्सन को टक्कर। चेरी की आधिकारिक पुष्टि का इंतजार।