शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

टायरला फुगे का येतात? लक्ष न दिल्यास ऐन वेगात फुटण्याची शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 12:11 PM

कारची सर्वात महत्वाची आणि खर्चिक बाब म्हणजे टायर. कारचे टायर चांगले असल्यास ठीक नाहीतर बऱ्याचदा टायर फुटुन अपघात होतात. यामुळे टायरची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा टायर नवीन असला तरीही त्याला फुगे म्हणजेच टेंगुळ येतात. चला जाणून घेऊया याचे कारण...

कारची सर्वात महत्वाची आणि खर्चिक बाब म्हणजे टायर. कारचे टायर चांगले असल्यास ठीक नाहीतर बऱ्याचदा टायर फुटुन अपघात होतात. यामुळे टायरची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा टायर नवीन असला तरीही त्याला फुगे म्हणजेच टेंगुळ येतात. चला जाणून घेऊया याचे कारण...

टायर हा मुख्यत: रबराचा बनविलेला असतो. मात्र, त्याला एकसंधपणा येण्यासाठी त्या रबरामध्ये तार आणि नायलॉनचे धागेही असतात. आपल्याकडील रस्ते खड्ड्यांनी युक्त असतात. यामुळे खरेतर टायरना फुगे येतात. कारण मोठ्या खड्ड्याची कडा किंवा एखाद्या अनुकुचीदार कडा असलेल्या खांबावरून टायर गेल्यास टायर रिमपर्यंत दाबला जातो. यामुळे हवेचा दाब टायरच्या बाजुच्या भागावर पडतो. तुम्ही म्हणाल टायर फ्लेक्सीबल असतो. मग फुगा कसा येतो....

टायरच्या बाजुच्या कडेवर दाब आल्याने तेथील धागे तुटतात. यामुळे तेथील रबर हवेमुळे फुगतो. यामुळे या ठिकाणी फुगा येतो. असा टायर चालविल्यास फुटण्याची दाट शक्यता असते. हा प्रकार टाळताही येऊ शकतो. मात्र, त्यासाठी आपले ड्रायव्हिंग रॅश असता कामा नये. कारण खड्ड्याच्या कडेवरून टायर जोरात गेल्यास त्यातील धागे तुटू शकतात. मात्र, हळूवार गाडी खड्ड्यावरून नेल्यास ही शक्यता कमी होते. 

ऑक्टोबर हिट आणि खड्ड्यांचे दुखणे...आता ऑक्टोबर हिट सुरु होत आहे. यामुळे रस्तेही तापलेले असतील. पावसाळ्यात पडलेले मोठेच्यामोठे खड्डे अद्याप बुजवले गेले नसतील. यामुळे गाडी सावकाश चालविणे आवश्यक आहे. कारण आधीच घर्षणामुळे टायर तापलेले असतील आणि त्यात त्यांच्यावर दाब पडल्यास फुगे येण्याची शक्यता आहे. यामुळे वेळोवेळी टायर तपासत राहणे गरजेचे आहे. फुगा दिसल्यास तातडीने टायर बदलावा. वॉरंटीमध्ये असल्यास कंपनीला कळवावे. 

टॅग्स :Automobileवाहनcarकार