चालवायच्या कुठे...! २०२४ मध्ये ४० लाख कारची विक्री; दुचाकींचा तर रस्त्यावर महापुरच आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:13 IST2025-01-08T17:12:52+5:302025-01-08T17:13:07+5:30
आता एवढ्या गाड्या चावायच्या कुठे, असा प्रश्न लोकांना पडेल एवढ्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

चालवायच्या कुठे...! २०२४ मध्ये ४० लाख कारची विक्री; दुचाकींचा तर रस्त्यावर महापुरच आला
देशात रस्त्यांचे नेटवर्क संथगतीने वाढत असताना सरत्या वर्षात तब्बल ४० लाख कार रस्त्यावर आल्या आहेत. दुचाकींचा तर महापुरच आला असून या विक्रीचा आकडा दोन कोटींना टच करता करता राहिला आहे. आता एवढ्या गाड्या चावायच्या कुठे, असा प्रश्न लोकांना पडेल एवढ्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत.
देशातील पॅसेंजर वाहनांचा रिटेल सेल पहिल्यांदाच ४० लाखांवर गेला आहे. एकूण ४०.७३ लाख कार विकल्या गेल्या आहेत. २०२३ पेक्षा ही वाढ ५.१८ टक्क्यांची आहे. फाडाने आकडेवारी जारी केली असून दुचाकींची विक्री १०.७८ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे. २०२३ मध्ये १.७१ कोटी दुचाकी विकल्या गेल्या होत्या. तर २०२४ मध्ये १.८९ कोटी दुचाकी विकल्या गेल्या आहेत.
दुचाकीचा सेल वाढला असला तरी कोरोनापूर्व काळाच्या अजून खूप मागे आहे. कोरोनापूर्वी दुचाकींच्या विक्रीच्या आकड्याने २.१ कोटींचा पल्ला गाठला होता. फाडानुसार कमर्शिअल वाहनांच्या विक्रीत काही वाढ झालेली नाही. कार सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल आल्याने त्यांची विक्री वाढली आहे. परंतू, खपही न झाल्याने कंपन्यांकडे कार तशाच पडून आहेत. याचा परिणाम मोठा डिस्काऊंट देण्यावर झाला आहे.
२०२५ मध्ये हा आकडा ४५ लाखांवर जाण्याची अपेक्षा ऑटो इंडस्ट्रीला आहे. यंदा नवनवीन कार लाँच होत आहेत. तसेच आधीच्या कारच्या अपडेट कारही येत आहेत. यामुळे विक्री वाढण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील काही महिने कंपन्या आधीच्या कारही भलामोठा डिस्काऊंट देऊन विक्री करण्याची शक्यता आहे. यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.