कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:47 IST2026-04-09T13:46:46+5:302026-04-09T13:47:33+5:30

अनेकदा चालकांना तिसरा गियर केव्हा टाकावा हेच समजत नाही, ज्यामुळे गाडीला झटके बसतात किंवा इंजिनवर ताण येतो.

When should you shift into third gear Know the correct speed and gear shifting method and save fuel | कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन

कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन

कार चालवतांना काही छोट्या-छोट्या गोष्टी माहीत असल्या तर मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होऊ शकते. कार चालवताना गियरचा योग्य पद्धतीने वापर केल्याने ड्रायव्हिंग तर सुलभ होतेच शिवाय इंजिनचे आयुष्य आणि मायलेजही वाढते. अनेकदा चालकांना तिसरा गियर केव्हा टाकावा हेच समजत नाही, ज्यामुळे गाडीला झटके बसतात किंवा इंजिनवर ताण येतो.

कार चालवताना केव्हा टाकावा तिसरा गियर? -
साधारणपणे, कार २० ते ३० किमी प्रति तास या वेगात असताना तिसरा गियर टाकावा. जेव्हा तुम्ही दुसऱ्या गियरमध्ये गाडी चालवत असता आणि वेग २५ किमीच्या आसपास पोहोचतो, तेव्हा तिसरा गियर टाकणे सर्वात योग्य मानले जाते. जर तुम्ही कमी वेगात तिसरा गियर टाकला, तर इंजिनवर ताम येतो आणि गाडी धक्के खाते. याउलट, दुसऱ्या गियरमध्ये जास्त वेळ वेगाने गाडी चालवल्यास इंजिनचा आवाज वाढतो आणि इंधन अधिक खर्च होते.

गियर बदलण्याची योग्य पद्धत -
तिसरा गियर लावताना क्लच पूर्ण दाबा, गियर बदलून क्लच हळूहळू सोडा आणि त्याच वेळी एक्सीलेटरचे संतुलन राखा. चढावर गाडी चालवताना किंवा गाडीत जास्त वजन असताना तिसरा गियर थोडा उशिरा टाकणे फायदेशीर ठरते. पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल कारमध्ये टॉर्क जास्त असल्याने तिथे गियर लवकर बदलता येतो. इंजिनच्या आवाजाकडे लक्ष देऊन गियर बदलल्यास ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित, सुलभ होते आणि इंधनाचीही बचत होते.

 

Web Title : तीसरे गियर में कब बदलें: गति और ईंधन बचाने के उपाय

Web Summary : ईंधन दक्षता के लिए लगभग 20-30 किमी प्रति घंटे पर तीसरे गियर में बदलें। उचित गियर उपयोग इंजन जीवन और माइलेज बढ़ाता है। इंजन की सुनें; पहाड़ी पर या भारी भार के साथ बाद में शिफ्ट करें। डीजल कारें उच्च टॉर्क के कारण पहले बदलाव की अनुमति देती हैं।

Web Title : When to Shift to Third Gear: Speed and Fuel Saving Tips

Web Summary : Optimize fuel efficiency by shifting to third gear around 20-30 kmph. Proper gear usage enhances engine life and mileage. Listen to the engine; shift later uphill or with heavy loads. Diesel cars allow earlier shifts due to higher torque.