नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:55 IST2025-12-15T12:53:52+5:302025-12-15T12:55:17+5:30
कंपनीची ही सिएरा, 'स्मार्ट प्लस', 'प्योर', 'प्योर प्लस', 'अॅडव्हेंचर', 'अॅडव्हेंचर प्लस', 'अकम्प्लिश्ड' आणि 'अकम्प्लिश्ड प्लस', अशा विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.

नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित एसयूव्ही 'टाटा सिएरा' नुकतीच भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. ही एक ५-सीटर एसयूव्हीअसून, अनेक व्हेरिअंट्समध्ये लॉन्च करण्यात आली आहे. आता कंपनीने या एसयूव्हीच्या टॉप मॉडेलसह सर्व व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किमती जाहीर केल्या आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ₹ ११.४९ लाख रुपयांपासून सुरू होऊन ₹ २१.२९ लाख रुपयांपर्यंत जाते.
कंपनीची ही सिएरा, 'स्मार्ट प्लस', 'प्योर', 'प्योर प्लस', 'अॅडव्हेंचर', 'अॅडव्हेंचर प्लस', 'अकम्प्लिश्ड' आणि 'अकम्प्लिश्ड प्लस', अशा विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे.
Tata Sierra च्या सर्व व्हेरिअंट्सची किंमत अशी -
- टाटा सिएरा स्मार्ट प्लस व्हेरिअंट : १.५-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन (मॅन्युअल ट्रान्समिशन) सह असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ ११.४९ लाख आहे. तर १.५-लीटर क्रायोजेट डिझेल इंजिन असलेल्या बेस मॉडेलची किंमत ₹ १२.९९ लाख आहे.
- प्योर आणि प्योर प्लस: टाटा सिएराच्या प्योर व्हेरिएंट्सची किंमत ₹ १२.९९ लाख ते ₹ १५.९९ लाख आहे, तर प्योर प्लस व्हेरिएंट्स ₹ १४.४९ लाख ते ₹ १७.४९ लाख रुपयांच्या दरम्यान आहेत.
- अॅडव्हेंचर आणि अॅडव्हेंचर प्लस : सिएरा च्या अॅडव्हेंचर मॉडलमध्ये तीन व्हेरिअँट लॉन्च करण्यात आले आहेत. अॅडव्हेंचर मॉडेल ₹ १५.२९ लाख ते ₹ १६.७९ लाख दरम्यान उपलब्ध आहे, तर अॅडव्हेंचर प्लसची किंमत ₹ १५.९९ लाख ते ₹ १८.४९ लाखपर्यंत जाते.
- टॉप मॉडेल अकम्प्लिश्ड आणि अकम्प्लिश्ड प्लस : सिएराच्या Accomplished मॉडलचे चार व्हेरिअँट आणि Accomplished Plus चे तीन व्हेरिअँट बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत. Accomplished व्हेरिएंट्सची किंमत ₹ १७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉपचे Accomplished Plus मॉडेल ₹ २१.२९ लाखांपर्यंत पोहोचते.