गुढी पाडवा आणि दारात चारचाकी नाही तर किमान नवीन दुचाकी तरी, असा काहीसा थाट महाराष्ट्रातील लोकांचा असतो. मुंबई देखील काही त्याला परकी नाही. परंतू, यंदाच्या गुढीपाडव्याच्या वाहन खरेदीत मुंबईकरांनी सर्वांना चकीत केले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत तर पाण्यासारखा खप हवा, परंतू मुंबईकरांनी यंदा नवीन वाहनांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगावर अनिश्चिततेचे सावट आहे. घरांच्या किंमती गगणाला भिडलेल्या आहेत. महागाईने सामान्य माणसांचेच नाही तर मुंबईत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचे देखील कंबरडे मोडले आहे. अशातच गुढी पाडव्याला ऑटो सेक्टरलाही मोठा धक्का देणारे संकेत मिळत आहेत. या गुढीपाडव्याला मुंबईत वाहन खरेदीत तब्बल १२.८७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, सुमारे ८,००० वाहनांची विक्री झाली आहे.
विक्रीच्या आकड्यात मोठी घसरणगेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे काहीसा पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतील विविध आरटीओ (RTO) कार्यालयांतून मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, नोंदणी झालेल्या वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
काय आहेत या मंदीची कारणे?ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या घसरणीमागे अनेक कारणे असू शकतात. वाहनांच्या वाढत्या किमती आणि सुट्या भागांच्या दरात झालेली वाढ यामुळे ग्राहक खरेदीचा विचार लांबणीवर टाकत आहेत. वाढती महागाई आणि कर्जाचे उच्च व्याजदर यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनी या मुहूर्तावर मोठी गुंतवणूक करणे टाळल्याचे दिसते. काही लोकप्रिय मॉडेल्ससाठी असलेला दीर्घ वेटिंग पिरीयडदेखील ग्राहकांच्या उत्साहावर विरजण घालणारा ठरला आहे. या घसरणीमुळे ऑटोमोबाईल डीलर्समध्ये चिंतेचे वातावरण असून, आगामी सणासुदीच्या काळात देखील हेच सावट असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Mumbai witnessed a significant 12.87% drop in vehicle sales this Gudi Padwa. Rising inflation, high loan interest rates, and global uncertainties deterred buyers, impacting the auto sector. Experts cite increased vehicle costs and waiting periods as contributing factors.
Web Summary : मुंबई में इस गुड़ी पड़वा पर वाहनों की बिक्री में 12.87% की गिरावट दर्ज की गई। बढ़ती महंगाई, उच्च ऋण ब्याज दरों और वैश्विक अनिश्चितताओं ने खरीदारों को रोका, जिससे ऑटो क्षेत्र प्रभावित हुआ। विशेषज्ञों ने वाहनों की बढ़ी कीमतों और प्रतीक्षा अवधि को भी कारण बताया।