दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:56 IST2025-10-13T12:56:26+5:302025-10-13T12:56:55+5:30

Diwali 2 Wheeler Discount: जीएसटी कमी झालेला आहे, त्यात दिवाळीच्या ऑफर्सही कंपन्या देत आहेत. आपला कसा नंबर वाढेल, पहिला येईल हे दाखविण्यासाठी कंपन्यांनी पराकाष्ठा सुरु केली आहे. 

Want to bring home 'Lakshmi' this Diwali? Then check out the 'top 5' scooters in the market Activa, Jupiter, Access, Ola s1pro, tvs iqube! Who is offering the best deal on petrol? | दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?

दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?

दिवाळी हा सण केवळ दिव्यांचा नाही, तर नवीन खरेदीचा देखील मोठा मुहूर्त असतो. याच मुहूर्तावर टू-व्हीलर कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्सचा पाऊस पाडतात. यंदाच्या दिवाळीत पेट्रोल स्कूटर्स आणि इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. जर तुम्ही नवीन स्कूटर खरेदीचा विचार करत असाल आणि ‘कन्फ्युज’ झाला असाल, तर आम्ही तुमच्यासाठी बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट ५ स्कूटर्स सांगणार आहोत.

जीएसटी कमी झालेला आहे, त्यात दिवाळीच्या ऑफर्सही कंपन्या देत आहेत. आपला कसा नंबर वाढेल, पहिला येईल हे दाखविण्यासाठी कंपन्यांनी पराकाष्ठा सुरु केली आहे. 

होंडा ॲक्टिवा (Honda Activa) आजही बाजारात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तिची टिकाऊपणा (Durability) आणि होंडाचा विश्वासार्ह सर्विस नेटवर्क. ज्यांना कोणतीही जोखीम नको, त्यांनी ॲक्टिवा घ्यावी. किंमत: ₹७४,३६९ पासून.

टीव्हीएस ज्युपिटर (TVS Jupiter) ही ॲक्टिवाला तगडी टक्कर देत आहे. ज्युपिटरमध्ये ॲक्टिवापेक्षा जास्त फीचर्स मिळतात, जसे की फ्रंट फ्यूल फिलर (पेट्रोल टाकीसाठी सीट उघडण्याची गरज नाही) आणि सर्वाधिक अंडरसीट स्टोरेज. कुटुंबासाठी उत्तम मानली जाते. किंमत: ₹७२,४०० पासून.

थोडा प्रिमिअमपणा हवा असेल तर सुझुकी ॲक्सेस १२५ (Suzuki Access 125) ही तरुणाईत तिच्या स्पोर्टी लूकमुळे आणि अत्यंत स्मूथ १२५cc इंजिनमुळे लोकप्रिय आहे. सुझुकी ॲक्सेस १२५ ही १२४ सीसी इंजिनसह ५० किमी/लिटर मायलेज आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देते. किंमत: ₹७७,२८४ पासून. युवकांसाठी स्टायलिश आणि आरामदायक.

इलेक्ट्रिकची क्रेझ (Ola vs TVS iQube)

यंदाच्या दिवाळीत ईव्ही (EV) सेगमेंटने धुमाकूळ घातला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक ईव्हीकडे वळत आहेत. ओला (Ola) कंपनी त्यांच्या S1 मॉडेलवर थेट मोठी सूट देत आहे. ज्यांना जास्त रेंज आणि टेक्नोलॉजीने भरलेले डिस्प्ले हवे आहेत, त्यांच्यासाठी ओला चांगला पर्याय आहे.

टीव्हीएस आयक्यूब (TVS iQube) हे टीव्हीएस या प्रतिष्ठित ब्रँडकडून येत असल्याने ग्राहक यावर जास्त विश्वास ठेवत आहेत. शहरात दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर अत्यंत आरामदायक आणि शांत मानली जाते.

Web Title : दिवाली के लिए टॉप 5 स्कूटर: पेट्रोल या इलेक्ट्रिक, बेहतरीन डील!

Web Summary : दिवाली में स्कूटरों पर ऑफर्स की भरमार! होंडा एक्टिवा, टीवीएस जुपिटर विश्वसनीयता और फीचर्स प्रदान करते हैं। सुजुकी एक्सेस 125 स्पोर्टी है। ओला एस1 और टीवीएस आईक्यूब ईवी में आगे हैं।

Web Title : Top 5 Scooters for Diwali: Petrol or Electric, Best Deals!

Web Summary : Diwali brings scooter offers! Honda Activa, TVS Jupiter offer reliability and features. Suzuki Access 125 is sporty. Ola S1 and TVS iQube lead the EV race.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.