शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:10 IST

Volvo EX30 launched in India: वोल्वो कार इंडियाने त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही कार वोल्वो एक्स ३० भारतात लॉन्च केली.

वोल्वो कार इंडियाने त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही कार वोल्वो एक्स ३० भारतात लॉन्च केली. आकर्षक लूक, टिकाऊपणा आणि शक्तिशाली बॅटरी असलेल्या या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत ४१ लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, १९ ऑक्टोबर २०२५ पूर्वी प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ती ३९.९९ लाख रुपयांच्या विशेष सवलतीच्या दरात मिळेल.

ही कार पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या कारची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. वोल्वोची ही तिसरी इलेक्ट्रिक कार असून, ती बेंगळुरूमधील होस्कोट येथील कंपनीच्या प्लांटमध्ये असेंबल केली जात आहे. भारतीय बाजारात ही कार फक्त मोठ्या ६९ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे.

डब्लूएलटीपी प्रमाणानुसार, ही एसयूव्ही एका चार्जमध्ये ४८० किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. बॅटरी मागील एक्सलवरील इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते, जी २७२ एचपी आणि ३४३ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त ५.३ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग पकडू शकते आणि तिचा कमाल वेग १८० किमी/ताशी आहे.

कारसोबत ११ किलोवॅटचा वॉलबॉक्स चार्जर मिळतो, ज्यामुळे बॅटरी ० ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी साधारणपणे ७ तास लागतात. कंपनी बॅटरीवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमीची वॉरंटी देत आहे. याशिवाय, ३ वर्षांची वाहन वॉरंटी, ३ वर्षांचे वोल्वो सर्व्हिस पॅकेज आणि ३ वर्षांची रोडसाईड असिस्टन्स देखील मिळत आहे. ५ वर्षांचे मोफत डिजिटल सर्व्हिस सबस्क्रिप्शन, ‘कनेक्ट प्लस’ देखील दिले जात आहे. वोल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा ​​यांनी दावा केला आहे की, ही कार आकर्षक डिझाइन, पॉवर आणि लक्झरी यांचा उत्तम संगम आहे, ज्यामुळे ती ग्राहकांना आकर्षित करेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Volvo EX30: Electric SUV launched in India, 480km range!

Web Summary : Volvo launched the EX30 electric SUV in India, priced from ₹41 lakh (ex-showroom). It offers a 480km range and is assembled in India. Deliveries begin in November 2025. Special pre-booking discount available.
टॅग्स :carकारAutomobileवाहनVolvoव्होल्व्हो