Volkswagen च्या 'या' SUV वर मिळतोय 4 लाख 20 हजार रुपयांचा तगडा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 03:44 PM2023-11-19T15:44:36+5:302023-11-19T15:45:02+5:30

Volkswagen Cars Discount Offers: तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या कारवर एक नजर टाका.

Volkswagen Cars Discount Offers: big discount of Rs 4 lakh 20 thousand is available on Volkswagen's 'Ya' SUV. | Volkswagen च्या 'या' SUV वर मिळतोय 4 लाख 20 हजार रुपयांचा तगडा डिस्काउंट

Volkswagen च्या 'या' SUV वर मिळतोय 4 लाख 20 हजार रुपयांचा तगडा डिस्काउंट

Volkswagen Cars Discount Offers: दिवाळी संपली, पण अजूनही तुम्ही नवीन कार खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट मिळवू शकता. ज्यांनी दिवाळीच्या काळात ऑफर्स चुकवल्या, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. Volkswagen ने त्यांच्या SUV वर 4.20 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट जाहीर केला आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत आहे.

युरोपियन कार कंपनी Volkswagen भारतात तिगुआन, तैगुन आणि व्हरटस, हे तीन मॉडेल भारतात विकते. आता कंपनी या कार्सवर रोख लाभ, एक्सचेंज ऑफर आणि लॉयल्टी बोनसद्वारे सूट देत आहे. तुम्ही या सवलतीचा फायदा 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत घेऊ शकता.

Volkswagen Tiguan: ₹4.20 लाखांपर्यंत सूट
कंपनी Volkswagen Tiguan वर 4.20 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. ही SUV खरेदी केल्यावर 75,000 रुपयांपर्यंतचा रोख लाभ आणि 75,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. याशिवाय 1,00,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदेही मिळू शकतात. सोबतच, 4 वर्षांसाठी 85,999 रुपये किमतीचे मोफत SVP आणि 84,000 रुपयांपर्यंतचे विशेष फायदे स्वतंत्रपणे मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला 4.20 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या 5 सीटर SUV ची एक्स-शोरूम किंमत 35.17 लाख रुपयांपासून सुरू होते.

Volkswagen Taigun: ₹1 लाख पर्यंत सूट
Volkswagen Taigun ही एक छोटी 5 सीटर SUV आहे, जी 5 स्टार GNCAP सुरक्षा रेटिंगसह येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.62 लाख ते 19.76 लाख रुपये आहे. फोक्सवॅगनवर 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला 60,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज आणि लॉयल्टी फायदे मिळतील. या कारवर तुम्हाला एकूण 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.

Volkswagen Virtus: ₹ 80 हजार पर्यंत सूट
फोक्सवॅगनच्या ताफ्यात एक उत्कृष्ट सेडान, Virtus देखील आहे. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 11.47 लाख रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही ही सेडान नोव्हेंबरमध्ये खरेदी केली तर तुमची 80 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. Virtus खरेदीवर 40,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. 40,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज आणि लॉयल्टी फायदे ऑफरमध्ये समाविष्ट आहेत.

Web Title: Volkswagen Cars Discount Offers: big discount of Rs 4 lakh 20 thousand is available on Volkswagen's 'Ya' SUV.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.