शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वाहनधारकांना मोठा दिलासा! ड्रायव्हिंग लायसन, आरसी, परमीटची व्हॅलिडिटी चौथ्यांदा वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 4:00 PM

driving license, RC book renewal: केंद्र सरकारच्या नव्या निय़मांनुसार जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हिंग लायसन म्हणजेही विना लायसन मानण्यात येते. यामुळे १ जानेवारीपासून पुन्हा लायसन तपासणी सुरु होणार होती.

लॉकडाऊनमध्ये संपलेली ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक आणि परमिटची व्हॅलिडीटी केंद्र सरकारने चौथ्यांदा वाढविली आहे. 31 डिसेंबरला ही सूट संपणार होती. ती आता 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या नव्या निय़मांनुसार जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हिंग लायसन म्हणजेही विना लायसन मानण्यात येते. यामुळे १ जानेवारीपासून पुन्हा लायसन तपासणी सुरु होणार होती. यामुळे आरटीओमध्ये ऑनलाईन, एजंटांद्वारे लायसन मुदतवाढ, आरसी मुदतवाढ आणि अन्य कामांसाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांना ऑनलाईनद्वारे अर्ज केल्यानंतर महिनामहिना नंतरची तारीख मिळाली होती. हा सर्व त्रास लक्षात घेत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ही मुदत तीन महिन्यांनी पुन्हा वाढविली आहे. 

मुदत वाढविली म्हणजे ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक रिन्यू करून घेऊ नका असे नाही. तर या तीन महिन्यांत गर्दी न करता वाहनचालकांना काम सोपे व्हावे यासाठी याचा वापर करता येणार आहे. या काळात तुम्ही तुमची कायगदपत्रे रिन्यू करू शकणार आहात. ही सूट ज्यांच्या कायगदपत्रांची मुदत 30 मार्च 2019 नंतर संपलीय त्यांच्यासाठी लागू असणार आहे.

 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लॉकडाऊनदरम्यान एका आदेश जारी करून मुदत संपलेले ड्रायव्हिंग लासयन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट आणि अन्य कागदपत्रांची वैधता ३० जून २०२० पर्यंत वाढवली होती. मात्र जून महिन्यापर्यंत परिस्थितीत फार सुधारणा न झाल्याने ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली गेली होती. या मुदतीमध्ये सरकारने तिसऱ्यांदा वाढ करून ती डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली होती. 

ड्रायव्हिंग लायसन कसे रिन्यू कराल?

  • ड्रायव्हिंग लायसन रिन्यू करण्यासाठी परिवाहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. parivahan.gov.in वर "ड्रायव्हिंग लायसन-संबंधित सेवा" वर क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर अर्जदाराला "डीएल सेवा" वर क्लिक करावे लागेल. यामध्ये लायसन नंबरसह अन्य माहिती भरावी लागणार आहे. यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • जवळच्या आरटीओ कार्यालयात अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
  • आरटीओमध्ये गेल्यावर बायोमेट्रिकद्वारे कागदपत्रे तपासली जाणार आहेत. यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन दिले जाणार आहे.
  • हीच प्रक्रिया वाहनाच्या आरसी नुतनीकरणाची देखील आहे. मात्र, यासाठी तुम्हाला पीयुसी, इन्शुरन्स आदी कागदपत्रे लागणार आहेत. 
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीसcarकारroad safetyरस्ते सुरक्षा