कारच्या आतील प्लॅस्टिक स्वच्छतेसाठी वॅक्स पॉलिशपेक्षा साध्या कापडाच्या ओलसर फडक्याचा वापर अधिक प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:12 IST2017-12-20T19:12:22+5:302017-12-20T19:12:36+5:30
कारमधील डॅशबोर्ड व अन्य प्लॅस्टिक पृष्ठभागाच्या स्वच्छतेसाठी बाजारातून वॅक्स पॉलिश विकत घेण्यापेक्षा साध्या पाण्याने व शांपूने ओलसर अशा कापडाने ते रोज पुसले तरी हे प्लॅस्टिक अधिक स्वच्छ राहाण्यास मदत होईल.

कारच्या आतील प्लॅस्टिक स्वच्छतेसाठी वॅक्स पॉलिशपेक्षा साध्या कापडाच्या ओलसर फडक्याचा वापर अधिक प्रभावी
कारच्या अंतर्गत स्वच्छता व टापटीपपणाबाबत अनेक कारमालक-चालक मोठी काळजी घेत असतात. कारच्या अंतर्गत भागातील विशेष करून प्लॅस्टिक भाग वा पृष्ठभाग असलेले डॅशबोर्ड, दरवाजावरील काही भाग आदी बाबी स्वच्छ वाटल्या पाहिजेत व विशेष करून त्यावर एक वेगळ्या प्रकारची तकाकी भासली पाहिजे, यासाठी बाजारात त्यासाठी वॅक्स पॉलिश मिळते. क्रीम, द्रवस्वरूप अशा पद्धतीमध्ये असणाऱ्या या पॉलिशला डॅशबोर्ड पॉलिश म्हणून मानले जाते. मुळात यामध्ये असलेले घटक पाहाता त्यामुळे कारच्या प्लॅस्टिकला धोका नसतो, हे खरे असले तरी त्याची किंमत पाहाता काहीवेळा ते महाग वाटतात. याचे कारण ते अनेकांकडून योग्य पद्धतीने वापरले जात नाहीत. तसेच वॅक्स नीटपणे न लावल्यास त्यावर धूळ पुन्हा चिकटण्याची शक्यता अधिक असते. काहीशा तेलकट स्वरूपाचे हे मिश्रण वा द्रावण असते.
हे लक्षात घेता व त्यासाठी वेळ द्यायचा तर तो कमी असेल तर खरे म्हणजे हे पॉलिश अजिबात वापरू नये. भारतीय व परदेशी कंपन्यांकडून बाजारात उपलब्ध असणारे हे पॉलिश काही काळापुरते छान वाटते. मात्र त्यापेक्षा सर्वसाधारणपणे प्लॅस्टिकला साफ करणे रोजच्या रोज ओलसर फडक्याने कारच्या अंतर्भागातील या प्लॅस्टिकच्या पृष्ठभागावरून हा हात फिरवला तरी हे प्लॅस्टिक दिसायला चांगले वाटेल. मुळात त्याकडे बघितल्यानंतर त्याच्या चकाकीपेक्षा ते स्वच्छ, डागविरहीत, ताजेपणाने दिसणारे असले पाहिजे. पॉलिशने येणाऱ्या चकाकीपेक्षा तो भाग स्वच्छ असणे गरजेचा आहे.
या प्लॅस्टिकच्या देखभालीसाठी काही छोटे मुद्दे पाहू. त्यामुळे त्याची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे हे पटेल.
कोलिनचा वापर त्यात अमोनिया असतो. त्यामुळे प्लॅस्टिकचा मूळ रंग कालांतराने दिसू शकतो वा रंग फिक्का पडत जाऊ शकतो. कोलगेटसारख्या टुथपेस्टचाही काहीजण वापर सुचवतात. तसा काही वापर करू नये. बाजारात मिळणार्या वॅक्स पॉलिशला वा स्प्रेचा वापरही करण्याची गरज नाही. वॅक्स पॉलिश नीट वापरले गेले नाही, तर चिकटपणा राहून त्यावर धूळ साचू शकते.
काय कराल प्लॅस्टिक स्वच्छतेसाठी?
सर्वप्रथम सुक्या कापडाच्या फडक्याने प्लॅस्टिक पृष्टभाग पुसून घ्या.
त्यानंतर शांपूच्या पाण्यात बुडवून काहीसे ओलसर असताना त्याने प्लॅस्टिक पुसा.
डाग पडलेले असले तर ते या शांपूच्या पाण्याने ओलसर फडक्याने घासून स्वच्छ करा.
हे सर्व झाल्याने कापड स्वच्छ पाण्याने धुवून शांपूमुक्त करा व त्यानंतर घट्ट पिळून घ्या.
आता या ओलसर वा दमट असलेल्या फडक्याने कारच्या अंतर्गत प्लॅस्टिकला पुसून घ्या.
यामुळे ते प्लॅस्टिक वाळायला वेळ लागणार नाही.
शांपू माइल्ड स्वरूपाचा वापरा.
स्पंजही या कामात चालू शकेल.
कापड स्वच्छ असू द्या. तेलाचे वगैरे डाग त्यावर नको.
त्यानंतर आठवड्यातून दोन-तीनवेळा ओलसर फडका फिरवला तरी हे प्लॅस्टिक नेहमी फ्रेश वाटेल.
प्लॅस्टिकवर डाह पडणार नाही, याची नेहमी काळजी घ्या, त्यामुळे सफाईमध्ये अधिक वेळ जाणार नाही.