Hyundai Creta चा बँड वाजणार! या 3 SUV धमाका करणार, पुढच्या महिन्यात होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 12:21 PM2023-06-18T12:21:16+5:302023-06-18T12:25:42+5:30

3 जबरदस्त मीड साइज एसयूव्ही क्रेटाला टक्कर देण्यासाठी येत आहेत.

upcoming 3 mid-size SUVs are coming in india to compete with hyundai creta | Hyundai Creta चा बँड वाजणार! या 3 SUV धमाका करणार, पुढच्या महिन्यात होणार लॉन्च

Hyundai Creta चा बँड वाजणार! या 3 SUV धमाका करणार, पुढच्या महिन्यात होणार लॉन्च

googlenewsNext

भारतीय कार बाजारात मिड साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये झपाट्याने वाढत आहे. यासेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाई क्रेटाची सर्वाधिक विक्री होत आहे. मात्र, लवकरच क्रेटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण 3 जबरदस्त मीड साइज एसयूव्ही क्रेटाला टक्कर देण्यासाठी येत आहेत. Honda, Kia आणि Citroen सारख्या कंपन्या त्यांचे प्रोडक्ट लवकच बाजारात उतरवत आहेत. महत्वाचे म्हणजे, जुलै महिन्यातच या 3 पैकी 2 कार लॉन्च होत आहेत.

Kia Seltos facelift –
पुढील महिन्यात सेल्टोसचे फेसलिफ्ट मॉडल येत आहे. महत्वाचे म्हणजे, या मिड साईज SUV ची अनौपचारिक बुकिंग काही निवडक डीलरशिप्सवर सुरू झाली आहे. सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये एक ट्विक्ड एक्स्टीरिअर डिझाइन, पॅनोरामिक सनरूफ, डॅशबोर्डवर एक ट्विन डिस्प्ले सेटअप, डुअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि पॉवर्ड टेलगेट मिळू शकते. यात ADAS ची सुविधाही मिळू शकते.

Honda Elevate – 
Honda Cars ने नुकतेच Creta आणि Grand Vitara ला टक्कर देण्यासाठी मिड साइज एसयूव्ही Honda Elevate सादर केली आहे. हे मॉडेल पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. सध्या काही डीलर्सकडे अनऑफिशियल बुकिंगदेखील सुरू आहे. होंडा एलीव्हेटसोबत सिक्स-स्पीड मॅन्युअल युनिट आणि सीव्हीटी युनिटसह 1.5-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. यात 10.25 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 7 इंचांचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि एका वायरलेस चार्जर सारखे फीचर्स असतील.

Citroen C3 Aircross – 
Citroen ने याच वर्षी एप्रिल महिन्यात भारतीय बाजारासाठी C3 Aircross वरून पडदा उचलला. सी3 हॅचबॅकवर आधारित सेव्हन सीटर एसयूव्हीच्या किंमतीची घोषणा यावर्षीच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. C3 एअरक्रॉसमध्ये एक 1.2-लिटरचे टर्बो-पेट्रोल इंजिन असेल. जे केवळ सिक्स-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या माध्यमाने चाकांना शक्ती प्रदान करेल. या मोटारचे पॉवर आउटपुट 109bhp आणि 190Nm टार्क असेल.
 

Web Title: upcoming 3 mid-size SUVs are coming in india to compete with hyundai creta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.