भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आणखी एका दमदार स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. Ultraviolette ने आपली नवीन X47 Crossover इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. स्पोर्टी डिझाइन, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक फीचर्ससह ही बाईक तरुणाईला आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे.
Ultraviolette X47 Crossover ची एक्स-शोरूम किंमत 2.74 लाख रुपयांपासून (FAME II सबसिडी वगळून) सुरु होते. कंपनीने ही बाईक सुरुवातीला काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.
X47 Crossover ही बाईक 'क्रॉसओवर' डिझाइन संकल्पनेवर आधारित आहे, जी स्पोर्ट्स बाईक आणि ॲडव्हेंचर बाईक यांच्यातील संतुलन साधते. समोर आणि मागे पूर्णपणे एलईडी लाइटिंग सेटअप देण्यात आला आहे, जो बाईकला एक आधुनिक लुक देतो.बाईकवर दिलेले ग्राफिक्स तिला अधिक आकर्षक बनवतात.
परफॉर्मन्स आणि रेंज
Ultraviolette X47 Crossover ही परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणतीही कसर सोडत नाही. यात 40 HP (30 kW) शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 610 Nm टॉर्क निर्माण करते. एका चार्जमध्ये 323 किमीपर्यंत रेंज देते. यात एक मोठा आणि पूर्णपणे डिजिटल टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स यांसारखे फीचर्स उपलब्ध आहेत. ड्युअल-चॅनल एबीएस (ABS), ट्रॅक्शन कंट्रोल आणि मल्टीपल रायडिंग मोड्स यांसारखे सुरक्षा फीचर्स यात आहेत. तसेच यात फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्यामुळे कमी वेळेत बाईक चार्ज करणे शक्य होते.