शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सुपरफास्ट 'मेड इन इंडिया' EV बाईक; 24 एप्रिलला होणार लॉन्च, पाहा किंमत अन् फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 18:18 IST

Ultraviolette Fastest Electric Bike: या EV बाईकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

Ultraviolette Fastest Electric Bike: भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हिलर मेकर कंपनी अल्ट्राव्हायोलेट (Ultraviolette) लवकरच आपली सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 24 एप्रिल रोजी ही सुपरफास्ट बाईक लॉन्च करणार आहे. या बाईकचे नाव काय आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. 

सध्या बाजारात कंपनीची अल्ट्राव्हायोलेट F77 इलेक्ट्रिक बाईकची विक्री सुरू आहे. या बाईकचा टॉप स्पीड सुमारे 140 किलोमीटर प्रति तास आहे. नवीन बाईकबद्दल सांगितले जात आहे की, तिचा वेग सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असेल. विशेष म्हणजे अल्ट्राव्हायोलेट F77 ही आतापर्यंतची सर्वात वेगवान ई-बाईक आहे. ही बाईक फुल फेअरिंग स्पोर्ट्स डिझाइनमध्ये येते. नवीन बाईकदेखील अशाच डिझाइनमध्ये येण्याची अपेक्षा आहे.

काय असतील फिचर्स?अल्ट्राव्हायोलेटच्या नवीन बाईकमध्ये पॉवरफूल मोटरसह F99 प्रोटोटाइपचे काही फिचरदेखील समाविष्ट केले जाऊ शकतात. नवीन बाईकवर डाउनफोर्स जनरेटिंग विंग्स दिसू शकतात. बाईकचे बाकीचे भाग, जसे की चेसिस, सस्पेन्शन, ब्रेक्स हे सध्याच्या मॉडेलसारखेच असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, Ultraviolette F77 ची एक्स-शोरूम किंमत 3.8 लाख ते 4.55 लाख रुपये आहे. आता नवीन सुपरफास्ट व्हर्जनची किंमत जास्त असू शकते. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग