TVS New Electric Scooter Launch India: टीव्हीएस नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार; ओला एस१ ला टक्कर देणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 20:01 IST2021-12-18T19:57:12+5:302021-12-18T20:01:07+5:30
TVS New Electric Scooter: नव्या स्पर्धेत टिकण्यासाठी व आपली जागा पुन्हा बनविण्यासाठी बजाज, हिरो, टीव्हीएस या कंपन्या नव्या ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणत आहेत. टीव्हीएस आयक्यूबनंतर आता आणखी एक ई स्कूटर बाजारात लाँच करणार आहे.

TVS New Electric Scooter Launch India: टीव्हीएस नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करणार; ओला एस१ ला टक्कर देणार?
भारतात नवनवीन स्टार्टअप कंपन्या इलेक्ट्रीक स्कूटर्स बाजारात आणत आहेत. परंतू जुन्या नावाजलेल्या कंपन्या कुठेतरी मागे पडत आहेत. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीना या कंपन्यांनी हलक्यात घेतले आणि याच इंधनाच्या स्कूटर विकण्यावर त्यांनी भर दिला. यामुळे ओलासारख्या कंपन्यांना मोठी संधी मिळाली आहे. हिरो, होंडा, टीव्हीएस सारख्या स्कूटर कंपन्या या स्पर्धेत खूप मागे पडल्या आहेत.
नव्या स्पर्धेत टिकण्यासाठी व आपली जागा पुन्हा बनविण्यासाठी बजाज, हिरो, टीव्हीएस या कंपन्या नव्या ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणत आहेत. टीव्हीएस आयक्यूबनंतर आता आणखी एक ई स्कूटर बाजारात लाँच करणार आहे. या स्कूटरची जास्त माहिती आलेली नसली तरी लीक झालेले फोटो ही स्कूटर ज्युपिटरसारखीच मोठी आणि सामानाची वाहतूक करण्यास उपयुक्त अशी स्कूटर आणणार आहे.
टीव्हीएस मोटर कंपनी येत्या काळात इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. नुकत्याच तामिळनाडूतील हिसारजवळच्या टीव्हीएस प्लँटजवळ एका व्यक्तीने टीव्हीएसच्या इलेक्ट्रीक स्कूटरची टेस्टिंग करताना काही फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये लूक दिसत असला तरी फीचर्सबाबत माहिती मिळत नाहीय. मात्र यामध्ये लोड कॅरिअर असतील. याद्वारे बीटूबी आणि बीटूसी स्पेसमध्ये लोक यातून सामान देखील नेऊ शकणार आहेत. फ्लॅट सीटच्या या स्कूटरमध्ये मागच्या बाजुला जास्त जागा होती.
टीव्हीएस आयक्यूब पेक्षा जास्त रेंजची बॅटरी आणि जास्त क्षमतेचे इंजिन असलेली स्कूटर लाँच करू शकते. टीव्हीएसला हिरो, होंडा, बजाजसह आता ओला, सिंपल वन सारख्या कंपन्यांना टक्कर द्यायची आहे. ही स्कूटर पुढील दोन-तीन महिन्यांत लाँच होण्याची शक्यता आहे.