TVS Apache: टीव्हीएसच्या या बाईकची कमाल; लाँच होताच झाली Sold Out
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 15:17 IST2021-09-26T15:17:08+5:302021-09-26T15:17:28+5:30
TVS Apache news: भारतात फेस्टिव्ह सीझन असल्याने सर्वच कंपन्या उत्पादनाचा वेग वाढवत आहेत. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचे ठरवत असाल तर हा फेस्टिव्ह सीझन तुमच्यासाठी चांगले पर्याय घेऊन येऊ शकतो.

TVS Apache: टीव्हीएसच्या या बाईकची कमाल; लाँच होताच झाली Sold Out
टीव्हीएस मोटर (TVS Motor Company) कंपनीने नुकतीच एक पॉप्युलर बाईक 2021 Apache RR 310 लाँच केली होती. या बाईकला भारतीय ग्राहकांनी एवढा प्रतिसाद दिला की कंपनीकडे एकही बाईक शिल्लक राहिली नाही. लाँच झाल्या झाल्या पहिल्याच महिन्यात कंपनीला सोल्ड आऊट असा बोर्ड लावावा लागला. या बाईकच्या 100 युनिट्सच एका महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. (2021 TVS Apache RR 310 BTO Sold Out In The First Month Of Launch.)
या महिन्यात कंपनीने केवळ 100 बाईक्सच उपलब्ध केल्या होत्या. आता मागणी वाढल्याने पुढील महिन्यापासून या बाईकचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. कंपनी सप्टेंबर ऑक्टोबरसाठी 150 बाईक बनविणार आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे पुढील काही दिवसांत भारतात फेस्टिव्ह सीझन येणार आहे. कंपनीच्या हातात सध्या 100 तरी ऑर्डर आहेत. यामुळे आणखी बाईक बनविल्या तर ज्यांना ही बाईक सणादिवशीच घ्यायची आहे त्या ग्राहकांसाठी कंपनी बाईक उपलब्ध करणार आहे.
पॉवर आणि फरफॉर्मन्स
टीव्हीएसची ही बाईक डायनॅमिक आणि रेससोबत येते. यामध्ये पूर्णपणे इंटीग्रेट सस्पेन्शन, रेस किट आणि नवीन रेस नॅचरल ग्राफिक्स सारखे फिचर्स आहेत. डायनॅमिक किट केवायबी फ्रंट फोर्क्ससोबत पूर्णपणे अॅडजस्टेबल सेटअप येतो. यामध्ये 20 स्टेप कंप्रेशन आणि रिबाऊंड डंपिंगसोबत 15 मिमी प्रिलोड अॅडजस्टमेंट मिळते. रियर मोनोशॉकमध्ये 20-स्टेप रिबाउंड डंपिंग आणि 10-स्टेप प्रीलोड एडजस्टर देखील या बाईकमध्ये मिळतात. रेस किटमुळे नवीन TVS Apache RR 310 अधिक ट्रॅक फ्रेंडली होते.
भारतात फेस्टिव्ह सीझन असल्याने सर्वच कंपन्या उत्पादनाचा वेग वाढवत आहेत. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचे ठरवत असाल तर हा फेस्टिव्ह सीझन तुमच्यासाठी चांगले पर्याय घेऊन येऊ शकतो.