मेरे सपनों की गाडी कब आएगी तू...; जुन्या कारला स्मार्ट कारमध्ये बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 09:31 AM2022-12-04T09:31:06+5:302022-12-04T09:31:46+5:30

ज्यांच्याकडे गाडी नसते ते आपल्याकडे गाडी कधी येणार, याचा विचार करतात. ज्यांच्याकडे गाडी असते ते कारमालक आपली गाडी अधिक अपग्रेडेड कशी होईल, याचा विचार करत असतात

Turn an old car into a smart car, Know About all | मेरे सपनों की गाडी कब आएगी तू...; जुन्या कारला स्मार्ट कारमध्ये बदला

मेरे सपनों की गाडी कब आएगी तू...; जुन्या कारला स्मार्ट कारमध्ये बदला

googlenewsNext

विनय उपासनी, मुख्य उपसंपादक

एका ठिकाणाहून दुसरीकडे अगदी विनासायास जाता यावे, यासाठी गाडी हवी, अशी पूर्वीची धारणा होती. त्यावेळी गाडीच्या इंजिनची अधिक काळजी घेतली जाते. आताही गाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच असला तरी त्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. म्हणजे काय तर माझ्या गाडीत कोणकोणते फिचर्स आहेत किंवा असावेत, याचा विचार प्रत्येकजण करू लागला आहे. थोडक्यात माझी गाडी स्मार्ट असावी, असा प्रत्येकाचा कल असतो. या सर्व पार्श्वभूमीवर गाडी स्मार्ट असणे म्हणजे काय, पाहू या. तुमची गाडी जुनी असली तरी तिच्यात पुढील काही तांत्रिक गोष्टी ॲड करणे ही आजच्या काळाची गरज आहे.

ज्यांच्याकडे गाडी नसते ते आपल्याकडे गाडी कधी येणार, याचा विचार करतात. ज्यांच्याकडे गाडी असते ते कारमालक आपली गाडी अधिक अपग्रेडेड कशी होईल, याचा विचार करत असतात. थोडक्यात काय जो तो आपापल्या स्वप्नातल्या कारचा विचार करत असतो...

कार ट्रॅकिंग
नव्या गाड्यांमध्ये ही इनबिल्ट सिस्टीम असते. 
मात्र, जुन्या गाड्यांमध्ये डॅशबोर्डच्या खाली हे डिव्हाइस लावता येते. 
तुमची गाडी कुठे आहे, तिचे मेन्टेनन्स कधी करायचे आहे, आदी बारीकसारीक तपशील यात स्टोअर होतो. 

ब्लूटुथ ॲडाप्टर

गाडी चालवताना आवडीचे संगीत वा गाणी ऐकणे सुरू असते. पूर्वी सीडी प्लेअर गाडीत असायचा. आता त्याची जागा ब्लूटूथ ॲडाप्टरने घेतली आहे. मनपसंत गाणी या ब्लूटूथ ॲडाप्टरच्या साह्याने ऐकता येतात.  गाडीची किल्ली हरवणे ही आपल्यासाठी अगदी सामान्य बाब आहे. 

किल्ली हरविल्यानंतर होणारी जिवाची तगमग प्रत्येक कार मालकाला परिचयाची असते. त्याचवेळी ती वेळखाऊ प्रक्रियाही असते. अशावेळी की ट्रॅकर कामास येते. सध्या वाहनविक्री क्षेत्रात बॅटरीवर चालणाऱ्या अनेक की ट्रॅकर उपलब्ध आहेत. तसेच ॲपलाही ते जोडता येते.

डॅशबोर्डवरील कॅमेरा

हल्ली गाडी ड्राइव्ह करताना त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याचे फॅड आहे. अशा परिस्थितीत डॅश कॅम उपयोगाला येतो.  गाडीच्या विंडशिल्ड वा डॅशबोर्डवर हा कॅमेरा लावता येतो. 

सध्याच्या गाड्यांमधील फिचर्स
समोर असलेल्या गाडीचा वेग कमी झाल्यास आपल्या गाडीचाही वेग कमी होतो.
ड्रायव्हरला झोप लागत असेल किंवा पेंग आली तर वॉर्निंग बीप वाजते. 
रस्त्यालगत असलेल्या गाइडलाइन्सनुसार गाडी आपोआप वळते. 
सहा एअर बॅग्ज, सेन्सर्स, गाडीचा वेग नियंत्रित करण्यासाठी ऑटो लॉक

टायर सेफ्टी मॉनिटर
टायरचे आयुष्य किती. त्याची किती झीज झाली आहे, वगैरे सांगणारे हे तंत्रज्ञान आहे.

 

 

Web Title: Turn an old car into a smart car, Know About all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :carकार