लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:32 IST2025-09-24T18:31:43+5:302025-09-24T18:32:31+5:30

कोण-कोणत्या कारला देणार टक्कर? जाणून घ्या...

Toyota's Mini Fortuner is coming to the market soon It will be produced in in Maharashtra Chhatrapati sambhajinagar How much can it cost | लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

toyota mini fortuner launching starting price 20 lakh rupees design performance details know here
भारतातील ऑटोमोबाईल उद्योगात जीएसटी कपातीमुळे आनंदाचे वातावरण आहे. वाहनांच्या किमती कमी होऊन त्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला आहे. दरम्यान आगामी काळात अनेक नव्या SUV बाजारात येणार आहेत. यांपैकीच एक म्हणजे, टोयोटाची मिनी फॉर्च्यूनर, जिला "बेबी लँड क्रूझर"ही म्हटले जात आहे. लवकरच भारतीय रस्त्यांवर धावू शकते.

किती असू शकते किंमत? -
टोयोटा FJ क्रूझरची किंमत भारतात सुमारे 20 लाख ते 27 लाख रुपयांपर्यंत असू शकते. यामुळे ही SUV थेट महिंद्रा स्कॉर्पिओ-N, टाटा सफारी, जीप कंपास आणि महिंद्रा थार RWD अथवा रॉक्स यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सना टक्कर देऊ शकते. ज्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये फॉर्च्यूनरसारखा लूक आणि ऑफ-रोडिंग क्षमता असलेली कार हवी आहे, त्यांच्यासाटी ही कार एक उत्तम पर्याय ठरू शकते.

केव्हा होणार लाँच? -
माध्यमांतील वृत्तांनुसार, FJ क्रूझरचे उत्पादन 2026 च्या अखेरपर्यंत थायलंडमध्ये सुरू होईल. यावंतर, ती भारतीय बाजारात 2027 च्या मध्यापर्यंत (संभाव्यतः जून 2027) लॉन्च केली जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील मेक-इन-इंडिया प्लांटमध्ये हिचे उत्पादन केले जाईल. यामुळे, हिची किंमतही नियंत्रणात आणि स्पर्धात्मक ठेवता येईल.

असं असेल डिझाइन - 
या SUV ला बॉक्सी आणि रफ-टफ लूक देण्यात येणार आहे. याची पुष्टी 2023 मध्ये जारी केलेल्या टीझर इमेजमधून होते. याशिवाय या कारला, LED हेडलॅम्प्स, DRLs, हाय ग्राउंड क्लीयरन्स, जाडजूड टायर्स आणि टेलगेटवर बसवलेले स्पेअर व्हील यांसारखी वैशिष्ट्ये दिले जातील. यामुळे गाडीला या SUV ला क्लासिक आणि दमदार लूक मिळेल. महत्वाचे म्हणजे, 4WD सिस्टीममुळे ही एसयूव्ही कठीण रस्त्यांवरही सहजपणे धावू शकेल. याशिवाय, इतरही अनेक खास गोष्टी या कारमध्ये दिसू शकतात.
 

English summary :
Toyota's Mini Fortuner, dubbed 'Baby Land Cruiser,' may launch by mid-2027, priced around ₹20-27 lakh. Manufacturing in Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra, will help keep costs competitive. It features a rugged design, 4WD, and targets Mahindra and Tata SUVs.

Web Title: Toyota's Mini Fortuner is coming to the market soon It will be produced in in Maharashtra Chhatrapati sambhajinagar How much can it cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.