प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:14 IST2025-08-18T18:13:09+5:302025-08-18T18:14:09+5:30
टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली लोकप्रिय सेडान टोयोटा कॅमरी हायब्रिडची 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च केली आहे.

प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
भारतातील प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली लोकप्रिय सेडान टोयोटा कॅमरी हायब्रिडची 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च केली आहे. ही नवीन आवृत्ती खास करून स्पोर्टी लूक आणि दमदार कामगिरीसाठी तयार करण्यात आली आहे.
काय आहे 'स्प्रिंट एडिशन'मध्ये खास?
कॅमरीच्या या नवीन मॉडेलमध्ये ड्युअल-टोन डिझाइन देण्यात आले आहे. यात मॅट ब्लॅक रंगाचे हुड, रूफ आणि ट्रंक देण्यात आले आहे, जे कारला एक आक्रमक रूप देतात. याशिवाय, या कारमध्ये नवीन मॅट ब्लॅक अलॉय व्हील्स आणि स्पोर्टी किट देखील मिळते. गाडीला रात्रीच्या वेळी आणखी आकर्षक बनवण्यासाठी यात डोअर वॉर्निंग लॅम्प आणि अॅम्बियंट लाइटिंगही देण्यात आली आहे.
दमदार कामगिरी आणि मायलेज
कॅमरी स्प्रिंट एडिशनमध्ये २.५-लीटर डायनॅमिक फोर्स इंजिन आहे, जे ई-सीव्हीटी गिअरबॉक्स आणि उच्च-क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरीसोबत येते. हे हायब्रिड इंजिन एकूण २३० पीएसची पॉवर जनरेट करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही कार जवळपास २५.४९ किमी/प्रति लीटर मायलेज देते. चालकांना त्यांच्या गरजेनुसार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड मिळतात.
सुरक्षितता आणि लक्झरीचा संगम
नवीन कॅमरी स्प्रिंट एडिशन सुरक्षिततेच्या बाबतीतही मागे नाही. यात टोयोटा सेफ्टी सेन्स ३.० तंत्रज्ञान आहे, ज्यात प्री-कोलिजन सिस्टीम, लेन डिपार्चर अलर्ट आणि डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी यात ९ एअरबॅग्स, व्हेहीकल स्टेबिलिटी कंट्रोल आणि ३६०-डिग्री कॅमेरा देखील आहे. शिवाय, आरामदायक प्रवासासाठी यात १०-वे पॉवर सीट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅडल शिफ्टर्स, हेड-अप डिस्प्ले आणि वायरलेस चार्जर यांसारख्या लक्झरी सुविधा मिळतात.