शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Toyota, Kia, Honda च्या कार महागणार, एप्रिलपासून किंमती वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 19:26 IST

नवीन आर्थिक वर्ष (FY2024-25) 1 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत.

कार कंपन्या साधारणपणे वर्षातून दोव वेळा हमखास वाहनांच्या किंमती वाढवताना दिसतात. सर्वसाधारणपणे कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीला आणि नंतर नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला असे घडते. आता नवीन आर्थिक वर्ष (FY2024-25) 1 एप्रिलपासून सुरू होत आहे, त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. टोयोटा आणि कियाने याची घोषणाही केली आहे. याशिवाय पुढील महिन्यापासून होंडाही आपल्या कारच्या किमती वाढवू शकते.

टोयोटा -आपण भारतामध्ये काही वाहनांच्या काही व्हेरियंटच्या किमती वाढविणार आहोत, असे टोयोटाने जाहीर केले आहे. या वाहनांच्या किंमतीत सुमारे 1 टक्का वाढ होण्याची शक्यता आहे. म्हत्वाचे म्हणजे, वाढलेल्या ऑपरेटिंग खर्चामुळे ही वाढ करण्यात येत आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार असल्याचे कंपनीने म्हले आहे. टोयोटाच्या भारतातील सध्याच्या लाइनअपमध्ये 6.86 लाख ते 2.10 कोटी रुपये किंमतीच्या 10 हूनही अधिक मॉडेल्सचा समावेश आहे.

किआ -टोयोटा शिवाय, किआने देखील आपल्या वाहनांच्या किंमती वाढविण्याचा खुलासा केला आहे. ही कोरियन कार कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमती तब्बल तीन टक्क्यांनी वाढविणार आहे. कंपनीने कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, इनपुट खर्च आणि पुरवठा साखळीशी संबंधित काही कारणे सांगितली आहेत. सध्या भारतात Kia चे चार मॉडेल्स विकली जातात. यांच्या किंमती 7.99 लाख ते 65.95 लाख रुपयांपर्यंत आहेत.

होंडा -होंडाने अद्याप किंमत वाढीसंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र काही ऑनलाइन वृत्तांमध्ये, त्यांच्या कारच्या किमतीही वाढू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. सध्या भारतातील होंडच्या ताफ्यात अमेझ, सिटी (सिटी हायब्रिडही) आणि एलिव्हेट यांचा समावेश आहे. या तिन्ही मॉडेल्सच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या भारतात होंडा कारच्या किमती 7.16 लाख ते 20.39 लाख रुपयां दरम्यान आहेत.