Toyota Innova Hycross ची किंमत अखेर जाहीर, जाणून घ्या नेमका किती खर्च येईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 04:27 PM2022-12-28T16:27:20+5:302022-12-28T16:31:13+5:30

टोयोटा किर्लोस्कर मोटरनं आज भारतीय बाजारात आपल्या बहुप्रतिक्षीत एमपीवी कार Toyota Innova Hycross ची किंमत जाहीर केली आहे.

toyota innova hycross price starts 1830 lakh here is complete variant list | Toyota Innova Hycross ची किंमत अखेर जाहीर, जाणून घ्या नेमका किती खर्च येईल?

Toyota Innova Hycross ची किंमत अखेर जाहीर, जाणून घ्या नेमका किती खर्च येईल?

googlenewsNext

टोयोटा किर्लोस्कर मोटरनं आज भारतीय बाजारात आपल्या बहुप्रतिक्षीत एमपीवी कार Toyota Innova Hycross ची किंमत जाहीर केली आहे. नव्या इनोवा हायक्रॉसमध्ये एमपीवीची किंमत १८,३०,००० रुपये ते २८,९७,००० रुपयांच्या दरम्यान असणार आहे. कंपनीनं ही कार नोव्हेंबर महिन्यात लॉन्च केली होती. नव्या इनोवा हायक्रॉसमध्ये अॅडव्हान्स फिचर्स आणि तंत्रज्ञानासह अनेक महत्वाचे बदल केले आहेत. सध्याच्या इनोवा क्रिस्टापेक्षा नव्या इनोवामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. 

कंपनीनं या कारची अधिकृत बुकिंग याआधीपासूनच सुरू केली होती. यात पेट्रोल आणि स्ट्राँग हायब्रिड व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. तसंच याचे चार व्हेरिअंट आहेत. ग्राहकांना ही कार दोन पेट्रोल व्हर्जन (जी आणि जीएक्स) आणि तीन पेट्रोल-हायब्रिड व्हर्जन वीएख्स, झेडएक्स आणि झेडएक्स (ओ) अशा पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. कार ७ सीटर आणि ८ सीटर पर्यायात असणार आहे. कारची बुकिंग ग्राहक ५०,००० रुपयांच्या टोकन अमाऊंटवर बूक करू शकतात. 

टोयोटा कार मॉड्युलर TNGA-C प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली एमवीपी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लॅडर फ्रेम बॉडीवर आधारित ही एमवीपी कार फ्रंट व्हील ड्राइव्ह सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. इनोव्हा हायक्रॉसला कंपनीनं एसयूव्ही स्टायलिंग टच देण्यात आला आहे. कारचा फ्रंट लूक एसयूव्हीसारखा दमदार देण्यात आला आहे. यात क्रोम बॉर्डरसह हेक्सागोनल ग्रिल, स्लीक LED हेडलाइट्स, मस्क्युलर फ्रंट बंपर आणि मोठे वेंट्स देण्यात आले आहेत. १८ इंचाचे अलॉय व्हील आणि अंडर बॉडी क्लॅडिंगमुळे कारला जबरदस्त लूक मिळाला आहे. यात टू-टोन आउड साइड रिअर व्ह्यू मिरर देण्यात आला आहे. ज्यात इंटिग्रेटेड LED टर्न सिग्नलही आहे. 

Toyota Innova Hycross ची किंमत...

हायब्रिड व्हर्जनचे व्हेरिअंट आणि किंमत
ZX(O)- २८,९७,००० 
ZX- २८,३३,०००
VX 8S- २४,०६,०००
VX 7S- २४,०१,०००

पेट्रोल व्हर्जनच्या व्हेरिअंटची किंमत-
G 7S- १८,३०,०००
G8S- १८,३५,०००
GX 7S- १९,१५,०००
GX 8s- १९,२०,०००

Web Title: toyota innova hycross price starts 1830 lakh here is complete variant list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Toyotaटोयोटा