लोकांनी क्रेटा, ब्रेझा, नेक्सन सोडून हिला बनवलं 2024 ची नंबर-1 SUV; एका क्लिकवर बघा टॉप-10 कारची लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 21:37 IST2025-01-22T21:36:12+5:302025-01-22T21:37:03+5:30
या आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 SUV...

लोकांनी क्रेटा, ब्रेझा, नेक्सन सोडून हिला बनवलं 2024 ची नंबर-1 SUV; एका क्लिकवर बघा टॉप-10 कारची लिस्ट
भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंटची क्रेझ सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी अर्थात २०२४ मध्ये टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही पंच ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. या काळात टाटा पंचने देशांतर्गत बाजारात एकूण २,०२,०३१ एसयूव्ही विकल्या आहेत. तर जाणून घेऊयात, गेल्या वर्षात सर्वाधिक विकल्या गेलेल्या 10 एसयूव्हींसंदर्भात...
तिसऱ्या क्रमांकावर राहिली ह्युंदाई क्रेटा -
विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली मारुती सुझुकी.मारुती सुझुकीने या काळात ब्रेझाच्या एकूण 1,88,160 एसयूव्हींची विक्री केली. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिली ह्युंदाई क्रेटा. या काळात एकूण 1,86,919 ह्युंदाई क्रेटांची विक्री झाली. याशिवाय चौथ्या क्रमांकावर राहिली महिंद्रा स्कॉर्पिओ. या कालावधीत महिंद्रा स्कॉर्पिओला एकूण 1,66,364 नवे ग्राहक मिळाले आहेत.
या आहेत सर्वाधिक विक्री झालेल्या 10 SUV -
मॉडेल - युनिट्स
टाटा पंच - २,०२,०३१
मारुती सुझुकी ब्रेझा – १,८८,१६० रुपये
ह्युंदाई क्रेटा - १,८६,९१९ रुपये
महिंद्रा स्कॉर्पिओ - १,६६,३६४
टाटा नेक्सन – १,६१,६११
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स - १,५६,२३६
मारुती सुझुकी ग्रँड विटारा - १,२२,७४७
ह्युंदाई व्हेन्यू - १,१७,८१९
किआ सोनेट - १,०६,६९० रुपये
महिंद्रा XUV700 - ९०,७२७