स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 21:34 IST2025-09-18T21:34:22+5:302025-09-18T21:34:41+5:30

...महत्वाचे म्हणजे, इतर कोणत्याही मॉडेलची 10 हजार युनिट्सहून अधिक विक्री झालेली नाही. या यादीत महिंद्रा आणि टाटाचे प्रत्येकी 2-2 मॉडेल्स आहेत, तर ह्युंदाई, टोयोटा, मारुती, किआ, होंडा आणि फॉक्सवॅगनचे प्रत्येकी 1-1 मॉडेल आहे. 

top 10 midsize suvs august 2025 Scorpio, Seltos Harrier Hyundai Creta People spent lakhs of rupees on this Dhasu SUV! | स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 

स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 

भारतीय बाजारात ऑगस्ट 2025 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप-10 मिड-साइज SUVs ची लिस्ट समोर आली आहे. गेल्या महिन्यात या सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटा अव्वल ठरली. खरे तर, क्रेटा गेल्या काही महिन्यांपासून या सेगमेंटसह देशातील नंबर-1 SUV बनली आहे. एवढेच नाही तर, या यादीतील 15 हजारांहून अधिक युनिट्स विकली गेलेली ही एकमेव कार आहे. महत्वाचे म्हणजे, इतर कोणत्याही मॉडेलची 10 हजार युनिट्सहून अधिक विक्री झालेली नाही. या यादीत महिंद्रा आणि टाटाचे प्रत्येकी 2-2 मॉडेल्स आहेत, तर ह्युंदाई, टोयोटा, मारुती, किआ, होंडा आणि फॉक्सवॅगनचे प्रत्येकी 1-1 मॉडेल आहे. 

ऑगस्ट 2025 मधील टॉप-10 मिड साइज SUVs च्या विक्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, ह्युंदाई क्रेटाचे 15,924 यूनिट, महिंद्रा स्कॉर्पिओचे 9,840 युनिट्स, टोयोटा हायरायडरचे 9,100 युनिट्स, मारुती सुझुकी ग्रँड विटाराचे 5,743 युनिट्स, महिंद्रा XUV 700 चे 4,956 युनिट्स, किआ सेल्टोसचे 4,687 युनिट्स, टाटा हॅरियरचे 3,087 युनिट्स, टाटा कर्वचे 1,703 युनिट्स, होंडा एलिव्हेटचे 1,660 युनिट्स आणि फॉक्सवॅगन टायगुनचे 1,001 युनिट्स विकले गेले आहेत.

ह्युंदाई क्रेटाचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशंस -
ह्युंदाई क्रेटामध्ये लेव्हल-2 ADAS सह 70 अॅडव्हाँस्ड फीचर्स मिळतात. ही कार 7 व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यांत E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX (O) व्हेरिअंटचा समावेश आहे. क्रेटाचे E व्हेरिअट दिसायला दुसऱ्या व्हेरिअंटप्रमाणेच दिसते. हीचे ग्रिल पूर्ण पणे भरलेले दिसते. यात ह्युंदाईचा लोगो लावण्यात आला आहे. या कारला उल्टे L-शेप्ड चे LED DRLs देण्यात आले आहेत. मात्र, हे हाय-स्पेक मॉडेलप्रमाणे जोडले गेलेले नाहीत. हेडलाइट्समध्ये लो बीमसाठी आत हॅलोजन बल्बसह एक प्रोजेक्टर युनिट आणि हाय बीमसाठी खालच्या बाजूला एक रिफ्लेक्टर सेटअप मिळते.

या व्हेरिअंटच्या इंटीरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, इतर ट्रिम्स प्रमाणेच यातही डॅशबोर्ड लेआउट देण्यात आले आहे. स्टीयरिंग व्हीलही तेथेच आहे. मात्र याला, ऑडियो कंट्रोल नाही. फ्रंट आणि रिअरला USB पोर्टसह मॅन्युअल AC देण्यात आला आहे. इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. असे अनेक फीचर्स या कारमध्ये देण्यात आली आहेत.

 

Web Title: top 10 midsize suvs august 2025 Scorpio, Seltos Harrier Hyundai Creta People spent lakhs of rupees on this Dhasu SUV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.