शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Toll Rate hike: टोलमुक्ती लांब राहिली, 1 एप्रिलपासून दर वाढणार; हायवेवरील प्रवास महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 11:46 IST

Toll Hike by NHAI: टोल वाढीचा थेट परिणाम मालवाहतुकीबरोबरच खासगी वाहनचालकांसह भाड्याने वाहने घेणाऱ्यांनाही जाणवणार आहे. भाड्याने कार केली तरी त्या मार्गावरील टोल हा ग्राहकाने भरायचा असतो. यामुळे त्याचा थेट फटका वाहने नसलेल्यांनाही बसणार आहे. 

देशात अनेक ठिकाणी मुदत संपली तरीही टोल वसुली (Toll Charges) जोरात सुरु आहे. खोट्या पावत्या देऊन वाहनचालकांसह सरकारलाही फसविण्याचे उद्योग सुरु आहेत. एकीकडे वाहनांच्या किंमती, इंधनाच्या किंमती वाढत (Petrol, Diesel Hike) असताना आता राष्ट्रीय हायवेवरून प्रवासदेखील महागणार आहे. 1 एप्रिलपासून टोलच्या दरांत 5 टक्के वाढ केली जाणार आहे.  (Highway Toll will hiked from 1 april 2021 by 5%.)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने टोलच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मासिक पासच्या दरातही वाढ केली जाणार आहे. NHAI दरवर्षी टोलच्या दरात वाढ करते. याचा थेट परिणाम मालवाहतुकीबरोबरच खासगी वाहनचालकांसह भाड्याने वाहने घेणाऱ्यांनाही जाणवणार आहे. भाड्याने कार केली तरी त्या मार्गावरील टोल हा ग्राहकाने भरायचा असतो. यामुळे त्याचा थेट फटका वाहने नसलेल्यांनाही बसणार आहे. 

याची झेरॉक्स ठेवा! खात्यात पैसे आहेत, पण FASTag स्कॅन झाला नाही, टोलनाक्यावरून फुकटात जा...काही आठवड्यांपूर्वीच खेड शिवापूर टोलनाक्यावर बोगस पावती प्रकरण उघडकीस आले होते. फास्टॅग वाहनांना बंधनकारक केल्यानंतर ज्यांच्या वाहनांवर फास्टॅग नाही त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जात आहे. या बोगस पावत्यांमुळे वाहनधारकांची लूट आणि भ्रष्टाचाऱ्यांना आंदनच मिळाले होते. आता फास्टॅगसाठीचा साधारण टोल वाढल्यावर दुप्पट टोलमध्येही वाढ होणार आहे. FASTag मुळे वाहनांच्या रांगा बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, टोल नाक्यांवर प्रत्यक्षातील स्कॅनिंगच्या समस्यांमुळे हे कागदावरच असल्याचे दिसत आहे. 

FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...

टोलनाक्यांवर फास्टॅगचावापर सुरु झाला तर त्यामुळे देशाचा इंधनावरील 20000 कोटी रुपयांचा खर्च वाचणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. 16 फेब्रुवारीपासून टोलनाक्यांवर फास्टॅग वापरणे सुरु झाले आहे. NHAI नुसार फास्टॅगमुळे देशभरात दिवसाला 104 कोटी एवढा विक्रमी टोल गोळा होत आहे. 2008 मध्ये प्रत्येक टोल नाक्यावर टोल वाढविण्याची तरतूद करण्यात आली होती. 

IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदल

कार विकत असाल तर...

फास्टॅग घेताना त्याला आपण आपल्या वॉलेट किंवा बँक अकाउंटला लिंक करतो. ज्यामुळे टोल भरताना लागणारे पैसे आपोआप तुमच्या अकाउंटमधून कापले जातात. अशामध्ये जर तुम्ही तुमची कार विकत असाल किंवा नवीन कार विकत घेत असाल त्यावेळी जुना फास्टॅग तुम्ही डिअ‍ॅक्टीव्ह केला पाहिजे. नाही तर त्या गाडीचा वापर कुणीही केला तर त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमधूनच कट होत राहतील. नोएडाचा रहिवासी अंकितने देखील अशीच चूक केली असून त्याला ती महागात पडली आहे. त्याने आपली कार विकली आणि कारवर लावलेला फास्टॅग काढून टाकायला तो विसरला. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाhighwayमहामार्गFastagफास्टॅगNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण