शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

फक्त 7 रुपयांत तब्बल 100Km चालेल ही इलेक्ट्रिक बाईक! जाणून घ्या किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 20:55 IST

electric motorcycle in cheapest price : ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रिक बाइक आहे. ही बाईक आपण केवळ ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता.

सध्या मोटारसायकल खरेदीपेक्षाही पेट्रोलच्या वाढत्या किमती हा अधिक चिंतेचा विषय बनला आहे. एक वेळ सामान्य माणूस हिंमत करून मोटारसायकसाठी मोठी रक्कम खर्च करेल, पण पेट्रोलच्या सातत्याने वाढत चाललेल्या किंमतीने सामान्य नागरिकांच्या नाकात दम आलणला आहे. अशा परिस्थितीत आता इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.

सध्या, बाजारात अनेक वाहन निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहने सादर करण्यात व्यस्त आहेत. विशेषत: दुचाकी सेग्मेंटमध्ये या कंपन्या अधिक आहेत. काही दिग्गज कंपन्या या सेगमेंटमध्ये नवीन मॉडेल्स तर सादर करत आहेतच, पण स्टार्टअप्स देखील यात मागे नाहीत. हैदराबाद येथील स्टार्टअप Atumobile Pvt Ltd च्या Atum 1.0 इलेक्ट्रिक बाईकबद्दल बोलायचे झाल्यास, तिची सुरुवातीची किंमत रु 74,999 (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही बाईक आपण केवळ ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता.

अशी आहे इलेक्ट्रिक बाईक -ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रिक बाइक असून, कंपनीच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमाने संपूर्ण देशात उपलब्ध आहे. कंपनीने या बाईकमध्ये पोर्टेबल लिथिअम-आयऑन बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास केवळ चार तास लागतात. महत्वाचे म्हणजे, ही बाईक सिंगल चार्जमध्ये 100 किलो मीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

या बाईकच्या बॅटरीला 2 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या बाईकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, हिला चालवण्यासाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही. या बाईकची टॉप स्पीड कमीत कमी ठेवण्यात आली आहे.  या बाईकमध्ये 6 किलोग्रॅमची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास केवळ 1 युनिट एवढीच वीज लाकते. यासाठी आपल्याला सामान्यपणे केवळ 6 से 7 रुपये एवढाच खर्च करावा लागेल. यानुसार, ही बाईक केवळ 7 रुपयांत 100 किलो मीटरपर्यंतची रेंज देईल. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरelectricityवीजbikeबाईकPetrolपेट्रोल