दीर्घ प्रतीक्षेनंतर मारुती सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक SUV e-Vitara डिसेंबर २०२५ मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये प्रथम सादर केलेली ही SUV केवळ भारतातच नव्हे, तर १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात होणार आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीने ही कार विशेष स्पेशल पर्पस इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. अर्थात ही कार पेट्रोल मॉडेलचे रूपांतर नसून, सुरुवातीपासूनच इलेक्ट्रिक कार म्हणून डिझाइन करण्यात आली आहे.
या SUV ची लांबी ४२७५ मिमी, रुंदी १८०० मिमी, व्हीलबेस २७०० मिमी असेल. या कारला पारंपरिक मारुती SUV स्टाइलसह मॉडर्न फ्यूचरिस्टिक लूक देण्यात आला आहे. हीचे उत्पादन गुजरातच्या हंसलपूर प्लांटमध्ये सुरू आहे. जगभरातील निर्यात डोळ्यासमोर ठेवत कंपनीने अधिक प्रमाणावर प्रोडक्शन लक्ष्य ठेवले आहे. कारण ही कार 100 हून अधिक देशांमध्ये एक्सपोर्ट केली जाणार आहे.
बॅटरी आणि रेंज: ही कार भारतात ४९kWh आणि ६१kWh बॅटरी पॅक पर्यायांसह बाजारात येईल. टॉप व्हेरिएंटची रेंज ५०० किमीपर्यंत असू शकते, जी या सेगमेंटमधील सर्वाधिक असेल. या कारमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाईल. यामुळे कार ८०% पर्यंत कमी वेळात चार्ज होईल. तसेच ही कार शहरात आणि हायवेवरही चांगला परफॉर्मन्स देईल असा दावा कंपनीने केला आहे.
फीचर्स आणि सेफ्टी - मारुती e-Vitara ही आतापर्यंतची सर्वाधिक फीचर लोडेड SUV असू शकते. या शिवाय या कारमध्ये ७ एअरबॅग्स, ADAS लेव्हल २ (ऑटो ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल), व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठा टचस्क्रीन इन्फोटेन्टमेंट, कनेक्टेड कार टेक, व्हॉइस कमांड. प्रीमियम टेक-फ्रेंडली इंटिरिअरसह नवीन डिझाइन लँग्वेज असेल.
किंमत व पोजिशनिंग: हे कंपनीचे सर्वात महाग प्रोडक्शन असेल. ही कार ग्रँड विटारा आणि विक्टोरिसपेक्षाही वरच्या लेवलवर असेल. या कारची किंमत अंदाजे २५-३० लाख (एक्स-शोरूम) एवढी असू शकते. ही कार Hyundai Creta EV, Tata Curvv EV, Mahindra XUV400 Pro, MG ZS EV सारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक SUV ला टक्कर देईल.
Web Summary : Maruti Suzuki's e-Vitara SUV, debuting in December 2025, boasts a 500km range. Built on a special electric platform, it will be exported globally. It offers 49kWh and 61kWh battery options, fast charging, advanced safety features, and a premium interior. Expected price: ₹25-30 lakh.
Web Summary : मारुति सुजुकी की ई-विटारा एसयूवी, दिसंबर 2025 में लॉन्च होगी, जिसकी रेंज 500 किमी है। एक विशेष इलेक्ट्रिक प्लेटफॉर्म पर निर्मित, इसे विश्व स्तर पर निर्यात किया जाएगा। इसमें 49kWh और 61kWh बैटरी विकल्प, फ़ास्ट चार्जिंग, उन्नत सुरक्षा सुविधाएँ और एक प्रीमियम इंटीरियर है। अनुमानित कीमत: ₹25-30 लाख।