Maruti Brezza ची जादू खल्लास, आता या छोट्या SUV वर लोक फिदा; किंमत फक्त 6 लाख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 01:41 IST2023-07-08T01:39:37+5:302023-07-08T01:41:45+5:30
खरे तर, ब्रेझाची बाजारावर जबरदस्त पकड आहे आणि लोकही तिला पसंत करतात. मात्र असे असले तरी, जून महिन्यात ब्रेझाची जादू फिकी पडल्याचे दिसते.

Maruti Brezza ची जादू खल्लास, आता या छोट्या SUV वर लोक फिदा; किंमत फक्त 6 लाख!
मारुती ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही आहे, असे आपल्याला वाटत असेल, मोठी चूक होईल. कारण, जून महिन्यात झालेल्या विक्रीत मारुती ब्रेझा बरीच मागे पडली आहे. देशात विकल्या गेलेल्या टॉप-10 कारसंदर्भात बोलायचे झाल्यास, ब्रेझा ही 9व्या क्रमांकावर आहे. खरे तर, ब्रेझाची बाजारावर जबरदस्त पकड आहे आणि लोकही तिला पसंत करतात. मात्र असे असले तरी, जून महिन्यात ब्रेझाची जादू फिकी पडल्याचे दिसते.
जून महिन्याच्या विक्रीत टाटा पंच देखील ब्रेझाच्या पुढे होती. सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप-10 कारच्या यादीत पंच 8व्या क्रमांकावर आहे. या महिन्यात पंचच्या एकूण 10,990 युनिट्सची विक्री झाली. तर ब्रेझाच्या 10,578 युनिट्सची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, टाटा पंच एक मायक्रो एसयूव्ही असून भारतात मायक्रो एसयूव्ही सेगमेंट पॉप्युलर करण्याचे श्रेय याच कारला जाते.
टाटा पंचची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते. तिचे टॉप व्हेरिअंटदेखील 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येते. या कारची प्राईस रेंज 6 लाख रुपयांपासून 9.52 लाख रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही एक पाच सीटर कार आहे. या कारला 366 लिटरचा बूट स्पेस आहे. पंचचा ग्राउंड क्लिअरन्स 187 मिलीमीटर एवढा आहे. हिला 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून ते 86 पीएस आणि 113 एनएम जनरेट करते. या कारसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे ऑप्शन मिळते.
याशिवाय या कारमध्ये 7.0 इंचाचे टचस्क्रीन सिस्टिम, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, वायपर, क्रूझ कंट्रोल, ड्यूल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.